Headlines

वैरागच्या संतनाथ महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य सोहळा:पहाटे नाथपंथीय जोग; दुपारी पालखी सोहळा, पारंपरिक वाद्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल‎



वैरागचे ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज यांच्या नारळी पौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या श्रावणमास यात्रा महोत्सवाचा मुख्य सोहळा आज ( गुरुवारी ) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. मुख्य यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक कार

.

मुख्य दिवशी पहाटे सुमारे पाच वाजता धामणगावकर बोधले महाराज यांचा नाथपंथीय जोग कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमानंतर श्री संतनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात होणार आहे. मध्यरात्रीनंतरच अनेक नागरिक दंडवत घालत मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत जाते. सकाळी गावातून शेरणीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

दर्शनासाठी एक किलोमीटरची रांग लागेल, त्यानुसार व्यवस्था केली आहे. दुपारी सुमारे एक वाजता श्री संतनाथ महाराजांची पालखी मंदिरातून बाहेर पडणार आहे. मंदिरातील विविध धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मानकऱ्यांना आहेर चढविण्याची परंपरा पार पडेल. त्यानंतर श्रींची पालखी ग्रामप्रदर्शनासाठी मंदिराबाहेर येणार आहे. पालखी सोहळ्यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेणार आहेत. पालखीच्या पुढे कणगीतला बुवा, हत्ती, मानाच्या नर्तिका, पारंपरिक लेझीम पथके, ढोल-ताशा पथक तसेच विविध साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी वैरागसह परिसरातील महिला, पुरुष, युवक आणि भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.

यात्रेत लाखोंची उलाढाल; परिसरात दुकानांची गर्दी यात्रेच्या काळात गाव तलावाजवळ तसेच मल्लिकार्जुन मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि लहान-मोठ्या पाळण्यांची मोठी लगबग पाहायला मिळते. यात्रेच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांसह महिला व पुरुषांची मोठी गर्दी खरेदीसाठी होत असते. खेळणी, घरगुती साहित्य, कपडे, खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीमुळे यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. स्थानिक व्यापारी व छोट्या व्यावसायिकांसाठी ही यात्रा मोठी पर्वणी ठरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *