Headlines

Samay Raina & Devendra Fadnavis Funny Moment at Maharashtra Cyber Event


कॉमेडियन समय रैना आणि महाराष्ट्र सायबरचा संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण सायबर कारवाई नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला एक मिश्कील प्रसंग आहे. महाराष्ट्र सायबरच्या ‘ऑपरेशन 1930’ या जनजागृती उपक्रमाच्या कार

.

विशेष म्हणजे, सत्कारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळ गेलेल्या समयने समोर ठेवलेल्या बिस्किटांकडे पाहून थेट, “मी एक बिस्किट घेऊ का?” असा प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांनीही हसत “हो, नक्कीच” असे उत्तर दिले. त्यानंतर समयने बिस्किट उचलले आणि माघारी गेला. या छोट्याशा प्रसंगाने कार्यक्रमातील वातावरण आणखी हलकेफुलके झाले.

1930 नंबर मी सेव्ह करून ठेवला आहे

महाराष्ट्र सायबरच्या कार्यक्रमात बोलताना समय रैनाने सुरुवातीलाच सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930चा उल्लेख केला. महाराष्ट्र सायबर आणि आपला संबंध बराच काळापासून असल्याचे सांगत त्याने या हेल्पलाइन क्रमांकाबाबतही मिश्कील टिप्पणी केली. समय म्हणाला, “1930 खरोखरच खूप उत्कृष्ट नंबर आहे. मी तर हा नंबर सेव्ह करून ठेवला आहे, कारण अनेकदा मला तिथूनच कॉल येतो.” यानंतर त्याने महाराष्ट्र सायबरच्या सक्रियतेचे कौतुक केले. भारतात असो किंवा अमेरिकेत, सायबर गुन्हेगारांचा माग काढून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची महाराष्ट्र सायबरची क्षमता असल्याचे त्याने विनोदी शैलीत सांगितले.

सायबर सेलचा अधिकारी कॉमेडियनच्या घरी गेला…

समय रैनाने त्यानंतर आपल्या जुन्या अनुभवाचा थेट उल्लेख न करता त्यावर मिश्कील टोला लगावला. तो म्हणाला की, महाराष्ट्र सायबर आणि त्याचा संबंध बराच काळ चालू आहे. त्यानंतर त्याने म्हटले, “आज पहिल्यांदा असं झालं आहे की सायबर सेलचा अधिकारी एका कॉमेडियनच्या घरी गेला, सकाळी त्याला घरातून उठवलं आणि या वेळी त्याचा सन्मान झाला आहे.” समयच्या या वक्तव्याचा संदर्भ त्याच्याशी संबंधित जुन्या वादाकडे असल्याचे मानले जात आहे. त्याने त्या घटनेचे तपशील सांगितले नाहीत; मात्र ‘घरातून उचलणे’ आणि ‘सन्मान करणे’ या दोन प्रसंगांमधील विरोधाभास विनोदी पद्धतीने मांडला. समयची ही टोलेबाजी ऐकून कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मंचावर उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हसताना दिसले.

मुख्यमंत्र्यांना विचारले- ‘बिस्किट घेऊ का?’; पुन्हा हशा

समय रैनाचा दुसरा मजेशीर प्रसंग त्याच्या सत्कारावेळी घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समयचा सन्मान करण्यात आला. सत्कारासाठी मुख्यमंत्री आणि समय आमनेसामने आले असताना समोर ठेवलेल्या बिस्किटांच्या प्लेटकडे समयचे लक्ष गेले. समयने कोणताही संकोच न करता मुख्यमंत्र्यांना “मी एक बिस्किट घेऊ का?” असे विचारले. फडणवीस यांनीही हसत त्याला परवानगी दिली. त्यानंतर समयने बिस्किट उचलले आणि माघारी गेला. या अनपेक्षित कृतीमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपस्थितांमध्ये पुन्हा हशा पिकला. समयच्या या दोन प्रसंगांचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

पाहा कार्यक्रमाची काही छायाचित्र…

ऑपरेशन 1930चा ट्रेलर आणि ‘1930 सायबर अँथम’चे अनावरण

महाराष्ट्र सायबरकडून बुधवारी मुंबईत सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ऑपरेशन १९३०’ या सायबर जनजागृती चित्रपटाच्या ट्रेलरचे आणि **‘१९३० महाराष्ट्र सायबर अँथम’**चे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह महाराष्ट्र सायबरचे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेते शरद केळकर, जावेद जाफरी, आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, गायिका सुनिधी चौहान आणि कॉमेडियन समय रैना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती मोहिमेत योगदान देणाऱ्या कलाकारांचा यावेळी सन्मानही करण्यात आला.

सायबर फसवणूक झाल्यास ‘1930’वर तातडीने संपर्क करा

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय, न्यायाधीश किंवा अन्य सरकारी यंत्रणांच्या नावाचा वापर करून नागरिकांना घाबरवले जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

सायबर फसवणुकीनंतर सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या कालावधीत तक्रार दाखल झाल्यास फसवणुकीची रक्कम पुढे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित होण्यापासून रोखण्याची किंवा ती परत मिळवण्याची शक्यता वाढते. मात्र तक्रार करण्यास विलंब झाल्यास पैसे अनेक खात्यांमधून फिरवल्यामुळे त्यांची वसुली अधिक कठीण होऊ शकते.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

सध्या सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही वेगाने बदलत आहेत. विशेषतः ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून त्यांच्या बँक खात्यांमधून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलीस अधिकारी किंवा तपास यंत्रणेच्या नावाने व्हिडीओ कॉल करून चौकशीच्या नावाखाली नागरिकांना मानसिक दबावाखाली ठेवले जाते.

याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे व्हॉइस क्लोनिंग, डीपफेक, बनावट ऑडिओ आणि व्हिडीओ यांसारखी नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे सोशल मीडिया किंवा फोनवरून मिळणाऱ्या कोणत्याही संशयास्पद संदेशाची किंवा कॉलची खातरजमा न करता आर्थिक व्यवहार करू नयेत, असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.

42 मिनिटांचा ‘ऑपरेशन 1930’ चित्रपट

सायबर फसवणुकीविरोधातील जनजागृती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘ऑपरेशन १९३०’ हा ४२ मिनिटांचा जनजागृतीपर चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटातील लघु दृश्ये, छोटे व्हिडीओ आणि समाजमाध्यमांवरील चित्रफितींच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याचा महाराष्ट्र सायबरचा प्रयत्न आहे. लोकप्रिय कलाकारांना या अभियानाशी जोडून सायबर सुरक्षेचा संदेश मोठ्या संख्येने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा..

टिपू सुलतान मुद्द्यावरून मुस्लिमांना नाहक त्रास:इथेनॉलमधून मोठा पैसा मिळत असल्याने सर्व पक्षांतील साखर सम्राट शांत- सुजात आंबेडकर

महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या फोटोचा मुद्दा गेली 4 ते 5 वर्षे राजकीय स्वार्थासाठी चर्चेत आणला जात आहे. 2021 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ‘औरंगजेब आणि टिपू सुलतानाची औलाद’ असे वक्तव्य करून या विषयाला वेगळे वळण दिले. त्यानंतर मुस्लिम युवकांना त्रास देणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आणि त्यांचे व्यवसाय-दुकाने बंद पाडण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे मुस्लिम तरुणांसमोर नोकरी आणि रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.