Headlines

Jalgaon Family Suicide Case; Tragic Incident In Amalner Takarkheda


जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटे एकाच कुटुंबातील चार जणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. पती, पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलींनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त के

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिल कुटुंबीय गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर धरणगाव ते अमळनेर दरम्यानच्या रेल्वे मार्गावर हा प्रकार घडला. पहाटे 4:40 वाजता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अमळनेर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

भिल कुटुंबाने हे पाऊल नेमक्या कोणत्या कारणांमुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक अडचणी होत्या का, यासह इतर सर्व शक्यतांचा पोलिस तपास करत आहेत. अमळनेर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अपघातग्रस्त वाहन पेटवून चालकाला मारहाणीचा प्रयत्न

जळगाव ते ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरा जवळ 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी अपघातात एका बालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने अपघातग्रस्त वाहनाला आग लावून चालकाला मारहाण केली, तसेच पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी 8 ते 10 जणांविरुद्ध दंगल आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 20 ईजी 3593 क्रमांकाच्या वाहनाचा चालक उबेद खान इकबाल खान पठाण (वय 34, रा. चोपडा) हा जळगावकडून ममुराबादकडे जात होता. त्यावेळी कावडयात्रेत रस्त्याने जाणाऱ्या प्रबल गवळी या बालकाला वाहनाची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना धक्काबुक्की

अपघाताच्या घटनेनंतर मृत बालकाच्या नातेवाइकांसह 8 ते 10 जणांच्या जमावाने घटनास्थळी बेकायदेशीरपणे जमून वाहनाला आग लावली. तसेच चालक उबेद खान याला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करत पेटत्या गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून चालकाला ताब्यात घेण्याचा व त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांना पकडून धक्काबुक्की केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयेंद्रसिंग आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून 8 ते 10 जणांविरुद्ध दंगल घडवणे, मारहाण करणे आणि पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हे ही वृत्त वाचा

मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा:नोकरी गेल्याच्या रागातून डॉक्टर टॉवरवर चढला, गळफासही घेतला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचला जीव

सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून संबंधित डॉक्टरने रेल्वे स्थानकातील उच्चदाब वीज टॉवरवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने त्याचा जीव वाचला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.