Headlines

लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार उल्हास पवारांना जाहीर:पुणे परिवारतर्फे गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा




पुणे परिवारतर्फे दिला जाणारा यंदाचा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नेते आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता सदाशिव पेठेतील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये पार पडणार आहे. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे परिवारचे अॅड. प्रताप परदेशी, विनायक घाटे आणि शिरीष मोहिते यांनी दिली आहे. या पुरस्कार सोहळ्यास कृषिमंत्री दत्ता भरणे, आमदार हेमंत रासने, विजयकुमार कुवळेकर, जन्मेजयराजे भोसले, पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संजय दराडे, कृषिकेश रावले, सुनील रासने, अण्णा थोरात आणि महेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कारासाठी नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष परेश हराळे, देशप्रेमी मित्र मंडळ, एरंडवणेचे कार्यकर्ते मंदार बलकवडे, विद्यानगरी मित्र मंडळ, धनकवडीचे अध्यक्ष प्रतीक कुंभार, अखिल रामनगर मित्र मंडळ, येरवडाचे अध्यक्ष राकेश चव्हाण आणि श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबागचे अध्यक्ष सागर दहिभाते यांची निवड करण्यात आली आहे. गणेश सेवा पुरस्कारासाठी मानस गोईलकर तसेच तृतीयपंथीय सर्व वादकांचे शिखंडी वाद्यपथक यांची निवड झाली आहे. गणराया गुणगौरव विशेष सन्मानासाठी पराग प्रभाकर बंगाळे आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पुंडलिक वासुदेव खलोरकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे परिवार गेल्या २१ वर्षांपासून लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार आणि गणेश सेवा पुरस्कार प्रदान करत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *