Headlines

राखीचा धागा सैनिकांच्या हातावर…बीज रुजणार मातीच्या कुशीत!:बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हातून सैनिक भावांसाठी विषमुक्त गावरान बियाण्यांच्या राख्या‎



राखी पौर्णिमेनिमित्त विषमुक्त गावरान वाणांच्या निर्माती व बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी यंदाही देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिक भावांसाठी तसेच बंधूस्थानी मानलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी गावरान बियाण्यां

.

अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे कुटुंबीयांसमवेत राहीबाईंनी या राख्या तयार केल्या. यंदा त्यांच्या नातवंडांनी सायली व धनश्री यांनीही त्यांना मदत केली. आपल्या बीज बँकेतील रासायनिक प्रक्रियारहित, विषमुक्त बियाण्यांचा वापर करून त्यांनी पर्यावरणपूरक राख्या साकारल्या आहेत. भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, वाल, काकडी, घोसाळी, डांगर भोपळा आदी पारंपरिक वाणांच्या बियाण्यांना आकर्षक आकार देण्यात आला आहे.

या राखीचे वैशिष्ट्य म्हणजे राखी बांधल्यानंतर तिच्यातील बीज जमिनीत रुजविल्यास त्यातून भाजीपाला किंवा धान्याचे रोप उगवू शकते. रक्षाबंधनाच्या स्नेहाबरोबरच गावरान वाणांचे संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश या उपक्रमातून दिला जातो.

चंद्रकांत पाटील यांना राहीबाई भाऊ मानतात, तर पाटीलही त्यांना बहिणीप्रमाणे आदर देतात. बीज बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत गावरान बियाणे पोहोचविणाऱ्या राहीबाईंना अनेक शेतकरीही आपली बहीण मानतात. त्यांच्या या स्नेहातूनच बीज-राखीचा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

पर्यावरण रक्षण अन् विषमुक्त अन्नसुरक्षेचा संदेश सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच एक धागा राष्ट्रबांधणीचा पुढे न्यावा, या विचारातून मी दरवर्षी बीज-राख्या पाठवते. रक्षाबंधनाचा सण हा कौटुंबिक नात्याचा उत्सव आहे. या कौटुंबिक नात्याला गावरान बियाण्यांची जोड देत पर्यावरण रक्षण आणि विषमुक्त अन्नसुरक्षेचा संदेश देणे, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे, असे बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *