![]()
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावर्षी २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाला आज बरोबर ७ महिने पूर्ण होत आहेत. आज देशभरात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र आपल्या लाडक्या भावाची, ‘अजितदादा’ची आठवण आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट.. प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील… तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे! रोहित पवारही आठवणीत भावुक सुप्रिया सुळे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही दादांच्या आठवणीत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी भावुक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, “तू ज्यांना जगण्याचा आधार आणि लढण्याची उमेद दिली, त्या हजारो बहिणी आज कोणाला राख्या बांधणार दादा?” अजित पवारांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रात आजही मोठी पोकळी जाणवत आहे. आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या या भावना वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. हेही वाचा.. मराठीपेक्षा सरकारला ‘यूपी’च्या निवडणुका महत्त्वाच्या?:मुदतवाढीवरून अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, चालकांना दिली मनसे स्टाईल कारवाईची धमकी राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान या निर्णयाचा समाचार घेत फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा
Source link
तू कुठूनतरी येशील आणि राखी बांधून घेशील…:रक्षाबंधनाला अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भावुक, रोहित पवार म्हणाले- हजारो बहिणी कुणाला राखी बांधणार?