Headlines

पै-पै जोडली, संकल्प केला अन् दिली 101 पोती साखर:गरीब शेतकऱ्याचा भक्तिभाव; वर्गणी न मागता पूर्ण केला अनेक वर्षांपूर्वीचा संकल्प‎



सप्ताह म्हटले की वर्गणी आणि देणगी गोळा करण्याची लगबग सुरू होते. मात्र, धनगरवाडी येथील ६० वर्षीय गरीब शेतकरी केरू विठ्ठल रकटे यांनी कोणाकडेही वर्गणी न मागता आपल्या कष्टाच्या कमाईतून तब्बल १०१ पोती साखर दान करून अनोखा भक्तिभाव जपला. योगीराज सद्गुरू गंग

.

साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही त्यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेला संकल्प पूर्ण केला. रकटे यांच्याकडे पाच एकर शेती असून शेतीला पाणी जेमतेम मिळत होते. त्यामुळे गुरेढोरे वळणे तसेच इतरांच्या शेतात काम करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कष्ट करत असतानाच वयाच्या २५व्या वर्षापासून त्यांनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची भक्ती सुरू केली. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ते महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. अवघ्या हजार लोकसंख्येच्या धनगरवाडी गावात कोरडवाहू शेती आणि मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे अनेक वर्षे सप्ताहाचे आयोजन झाले नव्हते.

गावात सप्ताह व्हावा, अशी रकटे यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून शेतीतील उत्पन्न, मजुरी तसेच दूध विक्रीतून मिळालेल्या पैशांतून थोडी-थोडी बचत केली.

त्यातून १०१ पोती साखर खरेदी केली. यावर्षी महंत रामगिरीजी महाराज यांनी धनगरवाडी येथे सप्ताहाला मंजुरी दिल्यानंतर रकटे यांनी आपला संकल्प पूर्ण केला.

विशेष म्हणजे त्यांनी मोठ्या देणगीदारांच्या यादीत नाव देण्याचा आग्रह धरला नाही किंवा आपल्या दानाचा गाजावाजा केला नाही. दान केल्यानंतर ते सर्वसामान्य भाविकांप्रमाणे पंक्तीत शांतपणे बसले.

‘एवढे दान कशाला करता? तुम्ही एवढे श्रीमंत झाला का?’ असे म्हणत अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून संकल्प पूर्ण केला. हा संकल्प सिद्धीस नेल्याचे समाधान मरेपर्यंत राहील, असे केरू रकटे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *