Headlines

मेळावा घ्याल तर तिथेच येईन, राज्य अस्थिर करू नका:खासदार संजय जाधवांना फोन करून मनोज जरांगेंचा संतप्त इशारा




मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करत संताप व्यक्त केला आहे. शिरसाट प्रमाणपत्र रद्द करतात आणि तुम्ही मेळावे घेत आहात. तुम्ही मेळावा घेऊ नका नाही तर मी कार्यक्रमस्थळी येईल, मग एकनाथ शिंदेंना नांदेडला जाणं अवघड होईल, राज्य अस्थिर करू नका. बंडू जाधव यांनी शिरसाट यांचे ऐकूण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिरसाट यांचे ऐकूण मराठ्याच्या अंगावर येणार असतील तर संजय जाधव संपून जातील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संजय जाधवांना वाटते की मी सत्ताधारी पक्षात गेलो आता काय होणार. शिरसाट यांनी जे प्रमाणपत्र रद्द केले ते पुन्हा मिळेपर्यंत आमचे शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध होऊ शकत नाही. मराठ्यांच्या छाताडावर मेळावा घेत आहे. यांनी शेतकऱ्यांना काय दिले आहे? आमची प्रमाणपत्र देईपर्यंत आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घ्यायचा नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. …हे वृत्त अपडेट करत आहोत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *