Headlines

राष्ट्रवादी पक्ष एकच अन् तो शरद पवारांचाच:पक्षाची घटना डावलून आमच्यावर अन्याय झाला; सर्वोच्च न्यायालयात न्यायाची अपेक्षा- सुप्रिया सुळे




राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ही शरद पवार यांनी केली आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून पक्ष काढून घेण्यात आला. पक्षाचे संविधान बघितले तर हा आमच्यावर अन्याय करण्यात आला. या संदर्भात आमची सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. तो पक्ष शरद पवारांना परत करावा हीच आमची मागणी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनी काय बोलावे तो त्यांचा अधिकार आहे. तुकाराम मुंडे आणि माध्यमांनी अन्न धान्य भेसळीबद्दल सत्य दाखवले आहे. निवडणूक येईल जाईल विजय होतील पराभव होतील पण मुलभूत सुविधेत राजकारण आणू नये, पण आणखी दोन पक्ष फोडले तरी चालतील पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेसळीत राजकारण करू नये. हा देश कोणाच्या मन मर्जीने चालत नाही, तर तो संविधानाने चालतो. पक्ष परत मिळाल्यानंतर पवार साहेबांनी त्या पक्षाचे काय करायचे, तो निर्णय त्यांनी घ्यावा. मग त्यांनी तो पक्ष कोणाला द्यावा किंवा नेतृत्व कोणी करावे. हे सरकारचे अपयश सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील यांना दर 3 महिन्यांनी आंदोलन करावे लागते हे सरकारचे अपयश आहे. सरकार त्यांच्याशी बोलत का नाही? कोणी ऐकले नाही, अन्याय झाल्यावरच माणूस आंदोलन करत असे सुळेंनी म्हटले आहे. कोर्टाने लवकर सुनावणी घ्यावी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका रात्रीत दुसऱ्याच्या घरात घुसून खोटे कागदपत्र दाखवून सातबारावर माझे नाव आहे असे म्हटले, तर ते घर तुमचे राहत नाही का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार आमदार किंवा खासदार कोणाला मतदान करतात किंवा कोणाच्या बाजूने उभे राहतात याला महत्त्व नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि मूळ कागदपत्रे कोणाकडे आहेत यावरून पक्ष ठरतो. निवडून आलेली संख्या ही पवार साहेबांच्या विरोधात गेली असली, तरी कागदावर आणि घटनेनुसार राष्ट्रवादी पक्ष कालही शरद पवारांचाच होता आणि आजही त्यांचाच आहे. कोणाचीच सत्ता ही कायमस्वरूपी नसते. हा मूळ पक्षावर झालेला मोठा दरोडा असून, आम्हाला न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणीची तारीख द्यावी.

हे ही वृत्त वाचा

मेळावा घ्याल तर तिथेच येईन, राज्य अस्थिर करू नका:खासदार संजय जाधवांना फोन करून मनोज जरांगेंचा संतप्त इशारा परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार संजय जाधव यांना थेट इशारा देत त्यांनी हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
परभणीच्या मेळाव्यात काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी तिथे आलो तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माघारी फिरणे अवघड होईल, असा दम जरांगे यांनी दिला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *