![]()
अक्कलकोट येथील राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर केला. याबद्दल अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नेहरू गल्ली येथील आमदार कार्यालयात सत्कार संपन्न झाला. जय भवानी.. जय शिवराय.. च्या जयघोषात आमदार कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज तथा बंटी राठोड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे उभारावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत असलेले समाज बांधव व नगरसेवक तम्मा शेळके यांचा सत्कार सकल मराठा समाजाच्या वतीने मनाचा फेटा, शाल, पुष्प गुच्छ देऊन संपन्न झाला. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अमर पाटील, बाळासाहेब घाटगे, प्रथमेश इंगळे, संजय मोरे, मनोज निकम, नगरसेवक अशोक जाधव, नन्नू कोरबू यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते. अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कल्याणशेट्टी यांचा सत्कार केला.
Source link
अक्कलकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार:सकल मराठा समाजाकडून आमदार कल्याणशेट्टींचा सत्कार