![]()
जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये अवघा २५.५ मिमी पावसाची नोंद झाली. अर्थात अपवाद वगळता ऑगस्ट कोरडाच राहिला. त्यामुळे खरिपातील पिकांना पाण्याचा मोठा ताण बसला आहे. जिल्हाभरात सुमारे ७.९ लाख हेक्टरवर यंदा खरिपाची पेरणी झाली. प
.
जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने बाजरी, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा खंड आणखी लांबल्यास उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊन उत्पादनात लक्षणीय घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही भागांत पिके वाचविण्यासाठी दुबार पेरणी अथवा पर्यायी पिकांचा विचार करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सुमारे १६ लाख मोठे पशुधन आहे. या माध्यमातून दररोज ४२ लाख लिटर दूध उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याचे मोठे अर्थकारण दूध व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु, चारा टंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाल्याने, दूध उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पुढील काही दिवसांत पाऊस झालाच नाही, तर खरीप वाया जाण्याची धास्ती निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवातील पाऊस खरीप तारणार ^ पिकांची स्थिती चिंताजनक आहे. महिनाभरात नगन्य पाऊस झाला आहे. पिकांना पाणी देणे गरजेचे असले तरी विहिरींनी तळ गाठला आहे. परंतु, गणेशोत्सव कालावधीत १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पाऊस होऊ शकतो. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची चिन्ह आहेत. ते झाले तर हा पाऊस होऊन, खरिप तरणार आहे. अन्यथा उत्पादनात घट होईल. – रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
अकोलेत परिस्थिती समाधानकारक अकोले तालुक्यात सर्वाधिक ५६४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात परिस्थिती तुलनेने समाधानकारक आहे. दुर्गम भागातील भात, तसेच बाजरी, सोयाबीन, कांदा, कोथिंबीर व भाजीपाला पिकांना पाणी मिळत असल्याने पिके चांगली आहेत. घाटघर-रतनवाडी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने विहिरी व तलावांची पाणीपातळीही चांगली आहे.
ऑगस्टमध्ये सर्वात कमी २५ मिमी पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यात दरवर्षी जूनच्या पहिल्या अथवा दुसऱ्या पाऊस हजेरी लावतो. परंतू, यंदा एलनिनोचा इफेक्ट प्रभावीपणे जाणवला. त्यानुसार जूनमध्ये अवघा ६६.१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यावेळी अत्यल्प पेरण्या झाल्या. पुढे जुलैमध्ये मात्र, पेरणीयोग्य १६१.३ मिमी पाऊस झाला होता. आता ही पिके महिनाभराची आहेत. पण पाऊस नाही. ऑगस्टमध्ये अवघा २५.५ मिमी पाऊस नोंदवला गेला.