Headlines

अकोल्यामध्ये राज्यस्तरीय युवा विकास अभियान




सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमात सन २०१२ पासून अग्रेसर येथील ‘सेवा फाउंडेशन””ने त्यांच्या ‘सेवा हॅपिनेस कार्यक्रमा””च्या माध्यमातून आजपर्यंत राज्यातील ४५० जिल्हा परिषद मराठी शाळांमधील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय साहित्य वितरण, अभ्यास दौरे, नवोदय शिष्यवृत्ती, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ दिला जात आहे. या उपक्रमांचा पुढील टप्पा म्हणून यंदापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सेवा ४ युवा”” हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला असून, या राज्यस्तरीय उपक्रमाची मुहूर्तमेढ अकोल्यात रोवली जात आहे, अशी माहिती उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रमुख आशिष वानखडे यांनी दिली. गोरक्षण रोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव वानखडे उपस्थित होते. राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी (दि.४) सकाळी १० वाजता न्यू राधाकिसन प्लॉट येथील माहेश्वरी भवन येथे होणार आहे. कार्यक्रमास अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, कवी अनंत राऊत, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, जागृत भारत विश्व अभियान नाशिकचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद आदी उपस्थित राहणार आहेत. उपक्रमात महाविद्यालयीन युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष वैभव वानखडे व राज्य प्रमुख आशिष वानखडे यांनी केले. ॲड. अनुराधा पवार, गौरव काटेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी समन्वय साधून सदस्य नोंदणी या अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी समन्वय साधून मोफत सदस्य नोंदणी केली जाईल. क्यूआर कोड स्कॅनर वा महाविद्यालयातील नियुक्त प्रतिनिधींमार्फत अर्ज उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी हे अर्ज प्राचार्यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह ‘सेवा फाउंडेशन कार्यालय, निकते हॉस्पिटलजवळ, आदर्श कॉलनी, अकोला’ येथे जमा करायचे आहेत. यानंतर विविध प्रशिक्षण, युवा महोत्सव, अभ्यास दौरे व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम राबवले जातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *