![]()
श्रावण सोमवार यात्रा महोत्सवानिमित्त शासनमान्य ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र श्री भोगेश्वर महाराज संस्थान, सासन रामापूर येथे आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतील नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, विविध आरोग्य तपासण्या, वैद्यकीय चाचण्या व औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमामुळे यात्रेला आरोग्यसेवेचीही जोड मिळाली. शिबिरात अकोला येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तरुण राठी यांनी सेवा दिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदेश मात्रे, डॉ. संजय मरसाळे, डॉ. शिवफकक्षा खान, डॉ. निकिता डोणारकर, डॉ. तंनझीर अहमद, डॉ. राहुल उमप, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. जय गावंडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले. आमदार तथा विधानमंडळ आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा, भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून तसेच उमेश ढोणे यांच्या पाठपुराव्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन कराव्या लागणाऱ्या आरोग्य तपासण्या व तज्ज्ञांचा सल्ला स्थानिक पातळीवर मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीने वैद्यकीय चाचण्यांचाही नागरिकांना लाभ उपलब्ध करून देण्यात आला. शिबिरासाठी सीमा तायडे, टॉपनर्स, सीएनसीडी स्वाती पवार, अश्विनी जाधव, समुपदेशन माधुरी तायडे, विभागीय व्यवस्थापक रूपाली ठाकरे, औषध निर्माण अधिकारी ऋतुजा सोनारी, एमपीडब्ल्यू राजेंद्र गावंडे, एमपीडब्ल्यू अनिल डोंगरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी उपसंचालक डॉ. वाकचौरे, अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राऊत, सिव्हिल सर्जन डॉ. विनोद पवार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
शिबिरासाठी श्री भोगेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष संजय काळे, सचिव शहादेव मेहरे, समन्वयक उमेश ढोणे, सरपंच, प्रशासक प्रा. विनोद सोनवणे, उपसरपंच रविंद्र पाचपोहे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, संस्थानचे ट्रस्टी, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी सहकार्य केले. अमोल कोरडे, गोपाळराव ढोणे, गजानन वानखडे, राहुल सोनवणे, आकाश सोनवणे, शुभम ढोणे, विकी गुरव, आकाश नांदुरकर, यश शामतमकर, पप्पू शांमतकर, देवीनंद जावरकर, वैभव जावरकर, दिनेश गिरे, रुपेश काळे, गजानन सोळंके, सुरेश सुभाष सोळंके, निवृत्ती ढोणे, मंगेश पुरी, मोहित चौबे, अमोल काळबांडे, अमर घाटे आदींनी आयोजनासाठी सहकार्य केले.
आरोग्य हीच खरी संपत्ती हा मोलाचा संदेश देत आयोजित या मोफत महाआरोग्य शिबिरामुळे धार्मिक यात्रेच्या पवित्र वातावरणा सोबतच सामाजिक, वैचारिक व आरोग्यविषयक उपक्रमांनाही एक नवी दिशा व विशेष महत्त्व प्राप्त झाले. या शिबिरामध्ये पंचक्रोशीतील नागरिक, भाविक भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा प्रत्यक्ष लाभ घेतला. ग्रामीण व दुर्गम भागात आधुनिक आरोग्यविषयक सुविधा, मोफत औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मोलाचे मार्गदर्शन स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य, महत्त्वपूर्ण ठरला. धार्मिक श्रद्धेला समाजसेवेची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.