Headlines

विद्यार्थिनींनी पोलिसांना बांधली राखी; रक्षाबंधनातून कर्तव्याचा केला सन्मान:ए.आर. पाटील सीबीएसई स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन उत्साहात केले साजरे‎



रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे नाते नव्हे, तर समाजाचे रक्षण करणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावनाही आहे, हा संदेश देत ए.आर. पाटील सीबीएसई स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरे केले. शाळेतील विद्यार्थिनींनी पोलिस ठाण्यात जाऊन कर्तव्य बजावणा

.

शाळेत विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला. त्यानंतर रक्षाबंधनाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना समजावा आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने पोलिस स्टेशनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.या वेळी पोलीस निरीक्षक राहुल आठवले (ठाणेदार), सुरेश कांबळे, योगेश सांभारे, मनोज गायकी, नीलेश देशमुख आदी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांना शुभेच्छा दिल्यात. या वेळी उपनिरीक्षकांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. पोलिसांचे कार्य, कर्तव्य, समाजाच्या सुरक्षेतील त्यांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे, ग्रीटिंग कार्ड आणि पोस्टर तयार करणे अशा विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये दृष्टी लुंगे, अबूबखार खान, उमेरखान, सिद्धार्थ काळे, अनिरुद्ध धोटे, रुद्र घोरमाळे, विराज बेलसरे, मधुरा निंभोरकर व पूर्वी चव्हाण यांनी यश मिळवले. या कार्यक्रमाला शाळेचे संचालक राहुल विजय मोहोड व पूनम मोहोड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात व व्यवस्थित झाला. रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बंधुभावासोबतच समाजाप्रती कृतज्ञता, आदर आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचा संदेश या उपक्रमातून दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *