![]()
शहर आणि परिसरातील अत्यंत गजबजलेल्या नेप्ती चौकात होणारी रोजची वाहतूक कोंडी, वाहनचालकांची मनमानी आणि त्यातून निर्माण होणारी समस्या निकाली निघणार आहे. सतत होणाऱ्या कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडण्याचे गंभीर प्रकार घडले होते. या समस्येवर कायमस्वर
.
या पाहणी दौऱ्यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. चौकातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. आता वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आयुर्वेद कॉलेजकडून येताना, नेप्तीकडून येताना आणि दिल्लीगेटकडून जाताना रस्त्याच्या मध्यभागी भक्कम लोखंडी जाळीचे बॅरिकेट्स (दुभाजक) उभे करण्यात आले आहेत. या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम बुधवारी दिवसभर दिसून आला. चौकालगत अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा झाला असून, बेशिस्त वाहनचालकांना आपोआप शिस्त पाळावी लागत आहे. बुधवारी दिवसभर या चौकातील वाहतूक अत्यंत सुरळीत सुरू होती.
बेशिस्त वाहनचालकांना लागला चाप पूर्वी चौकात कुठूनही वाहने घुसण्याचे प्रकार केले जात असल्याने रोज वाहतूक ठप्प व्हायची. आता रस्त्याच्या मध्यभागी लावलेल्या बॅरिकेट्समुळे गाड्यांना एकाच मार्गिकेवरून जाणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांची मनमानी पूर्णपणे टळली असून, चौकात आपोआपच स्वयंशिस्त निर्माण झाली आहे. बुधवारी कोंडीचा सामना करावा लागला नाही.