Headlines

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे:प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांचे आवाहन, वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात‎




प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बीएड दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत यांनी प्रास्ताविक केले. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवू नये. सातत्याने शिक्षण घेत राहा आणि उच्च पदापर्यंत पोहोचा असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. वार्षिक अहवाल विद्यार्थी शिक्षिका धनश्री अवसरे व विद्यार्थी शिक्षक अथर्व काळे यांनी सादर केला. पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव प्रा. डॉ. अविनाश भांडारकर यांच्या निवेदनातून करण्यात आला. आर्थिक साक्षरता कोर्सबाबतची माहिती आर्थिक साक्षरता विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रदीप शेळके यांनी दिली. पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. विलास पांढरे यांनी केले. मनोगत सत्रात प्रा. डॉ. अविनाश भांडारकर, विद्यार्थी शिक्षिका साक्षी लोंढे, निकिता मोकाटे, ईशा साळवे व सोनाली दारुंटे यांनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधी कुलदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात दादाराम ढवाण यांनी शिक्षणातील गुणवत्ता, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. उपप्राचार्य डॉ. गोकुळदास लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी प्रा. रुपाली ओक, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. मनिषा वर्पे – सहाणे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव, प्रा. सुनील वाकचौरे, मंजूषा बोरुडे, कल्याणी चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्राक्षे शीतल व साक्षी शिंदे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *