अजित पवार यांच्या अपघाताबाबत मी आजपासून बोलणार नाही, असे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षण व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. 12 वी, ‘नीट’ की ‘सीईटी’ परीक्षा द्यायची, अशा गोंधळात मुले नाहक भरडली जात असून सामान्य कुटुंबांना हे शिक्षण परवडण
.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या देशात शिक्षणाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांनी 12 वीचा अभ्यास करायचा की ‘नीट’ आणि ‘सीईटी’चा शासनाने कोणती तरी एकच परीक्षा व्यवस्थित घेतली पाहिजे. या विविध परीक्षांच्या फेऱ्यांमध्ये मुले नाहक भरडली जात आहेत. मुलांनी नक्की किती परीक्षा द्यायच्या? आणि सामान्य कुटुंबांना हे महागडे शिक्षण परवडणार तरी कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही शिक्षणाचे राजकारण करत नसून हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतो, असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी आमदारांना अन् मंत्र्यांना सांभाळावे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, ‘तुमच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सांभाळा’ अशी विनंती त्यांना करणार आहे.
डीजेबाबतचे नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नागपूर शहरात जर डीजेबाबत नियम आणि कायदे काटेकोरपणे लागू होऊ शकतात, तर मग संपूर्ण महाराष्ट्रात ते का लागू केले जात नाहीत? मुख्यमंत्र्यांनी या विषयावर स्वतः लक्ष घालून नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. सण-उत्सव साजरे झालेच पाहिजेत, ती आपली संस्कृती आहे; परंतु ते कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीतच झाले पाहिजेत. रात्री 10 वाजेनंतर डीजे बंद व्हावा आणि त्याचा आवाज मर्यादित असावा, हा नियम काही आम्ही काढलेला नाही, तर तो न्यायालयाचा आणि प्रशासनाचा आदेश आहे.
मारामारी ही आमची संस्कृती नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणावरही असा हात उगारणे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. मारामारी करणे ही आमची संस्कृती नाही, आम्ही अशा गोष्टींना नेहमी शांततेच्या मार्गानेच उत्तर देऊ. हे ही वृत्त वाचा
न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती:देशभरातील 8 उच्च न्यायालयांत नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. .केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सवरून या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. वाचा सविस्तर