Headlines

MPSC Paper Leak Case; Devendra Fadnavis Forms High-Level Committee



देशातील ‘नीट’ पेपरफुटीच्या प्रकरणानंतर देशभरात मोठे आंदोलन झाले, ज्यामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, त्यानंतरही महाराष्ट्रात सीईटी आणि अत्यंत पारदर्शक मानल्या जाणाऱ्या ‘एमपीएससी’ परीक्षेचे पेपर फुटल्याच्या घटना उघडक

.

या शिष्टमंडळामध्ये सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे यांसारखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्राधान्यक्रम देत, MPSC पेपरफुटीच्या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग आढळेल, त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट केले.

उच्च स्तरीय समिती गठित

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. ही प्रक्रिया अधिक कशी सुदृढ करता येईल यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. त्यात युपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटी प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला असून ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे. पुण्यात सुद्धा ही समिती जाईल. एकीकडे हे प्रयत्न होत असताना काही कठोर कायदे सुद्धा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल.

विद्यार्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरुच असून या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग आढळेल, त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल, अशाच सुधारणा आम्ही करीत आहोत. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी दिला आहे.

तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व घटकांना विश्वासात घेऊन तातडीने अंमलात आणल्या जातील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *