Headlines

घाट जिंकत धावपटूंनी गाठली विजयरेषा!:15 व्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सांगलीचे प्रवीण कांबळे, राणी मुचंडी अव्वल




यवतेश्वरच्या घाटातील चढणीला आव्हान देत, वळणावळणाचा मार्ग पादाक्रांत करत आणि उतारावर वेगाची कमाल साधत देशभरातील धावपटूंनी साताऱ्याच्या रस्त्यांवर रविवारी धावण्याचा थरार उभा केला. 15 व्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये दहा हजार धावपटूंच्या विक्रमी सहभागाने स्पर्धेला अभूतपूर्व रंगत आली. अवघड घाटमार्ग, प्रेक्षकांचा उत्साह आणि अंतिम रेषेपर्यंत सुरू राहिलेली चुरस यामुळे यंदाची स्पर्धा केवळ मॅरेथॉन न राहता साताऱ्याच्या क्रीडा संस्कृतीचे भव्य प्रदर्शन ठरली.पुरुषांच्या खुल्या गटात प्रवीण कांबळे यांनी 1 तास 10 मिनिटांची वेळ नोंदवत बाजी मारली. त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर राहत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. अभिषेक कमन्ना देवकाते यांनी 1 तास 11 मिनिटे 13 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे, तर कालिदास लक्ष्मण हिरवे यांनी 1 तास 11 मिनिटे 42 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. अव्वल तिघांमध्ये अवघ्या काही सेकंदांचा फरक राहिल्याने अंतिम टप्प्यातील चुरस लक्षवेधी ठरली. महिलांच्या खुल्या गटात राणी सदाशिव मुचंडी यांनी 1 तास 30 मिनिटे 53 सेकंदांची वेळ नोंदवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. निशा आनंद पासवान यांनी 1:36:44 वेळेसह दुसरा, तर संतोषी महादेव नरळे यांनी 1:37:25 वेळेसह तिसरा क्रमांक मिळविला. साताऱ्याचा घाट… धावपटूंची खरी परीक्षा सातारा हिल हाफ मॅरेथॉनची खरी ओळख तिच्या आव्हानात्मक मार्गात आहे. यवतेश्वर घाटातील तीव्र चढणी, वेगाची परीक्षा घेणारे उतार, सलग वळणे आणि बदलता भूभाग यामुळे धावपटूंच्या ताकदीबरोबरच त्यांची रणनीती आणि मानसिक तयारीही पणाला लागली. सपाट मार्गावर वेग दाखविणे वेगळे आणि घाटात तोच वेग टिकविणे वेगळे; याच कसोटीवर अनेक धावपटूंची खरी ताकद स्पष्ट झाली. यंदाच्या स्पर्धेत पुणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह सांगली परिसरातील धावपटूंची विशेष उपस्थिती आणि उल्लेखनीय कामगिरी दिसून आली. विविध वयोगटांतील धावपटूंनी अंतिम रेषेपर्यंत जिद्दीने लढत स्पर्धेला रंगत आणली. ‘मराठी शाळा वाचवा’चा संदेश धावत पोहोचला मॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच सामाजिक संदेश देण्याची परंपराही यंदा पाहायला मिळाली. काही धावपटूंनी ‘नगरपालिकेच्या मराठी शाळा वाचवा’ असे संदेश असलेले फलक हातात घेत धाव घेतली. त्यामुळे क्रीडा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम या स्पर्धेत दिसला. पैठणीतील महिला धावपटूंनी वेधले लक्ष पुण्यातून आलेल्या काही महिला सदस्यांनी पारंपरिक पैठणी परिधान करून मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. घाटातील चढ-उतारांवर पारंपरिक वेशात धावत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे साताऱ्याच्या हिल मॅरेथॉनला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचीही किनार लाभली. 15 वर्षांची परंपरा; साताऱ्याची स्वतंत्र ओळख सातारा हिल हाफ मॅरेथॉनने गेल्या 15 वर्षांत देशातील आव्हानात्मक हिल रनिंग स्पर्धांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सातारा रनर्स असोसिएशनच्या आयोजनातून आणि पुनीत बालन ग्रुपच्या मुख्य प्रायोजकत्वातून झालेल्या यंदाच्या स्पर्धेत दहा हजार धावपटू सहभागी झाले. त्यामुळे साताऱ्याच्या क्रीडा पर्यटनाला आणि शहराच्या राष्ट्रीय क्रीडा नकाशावरील स्थानाला आणखी बळ मिळाले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनचे डॉ. संदीप काटे, डॉ. प्रताप गोळे, शैलेश ढवळीकर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. विजेत्या धावपटूंना पारितोषिक वितरण सोहळ्यात मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निकाल : पुरुष गट प्रवीण कांबळे – 1:10:00
अभिषेक कमन्ना देवकाते – 1:11:13
कालिदास लक्ष्मण हिरवे – 1:11:42 (वयोगट 30-34) कालिदास लक्ष्मण हिरवे – 1:11:42
अनंत बी. गावणकर – 1:16:33
सुमित सुनील मोरे – 1:17:41 (वयोगट 35-39) अनिल शिवाप्पा कोरवी – 1:19:37
गणेश विठ्ठल बागुल – 1:23:45
मनोज सुरेश राणे – 1:26:14 (वयोगट 40-44) परशराम लक्ष्मण भोई – 1:21:54
मल्लिकार्जुन धनप्पा परडे – 1:23:31
मनोहर मारोत्राव बारई – 1:25:48 (वयोगट 45-49) सुनील ईश्वर शिवणे – 1:25:48
आर.बी.एस. मोनी – 1:30:07 निकाल : महिला गट राणी सदाशिव मुचंडी – 1:30:53
निशा आनंद पासवान – 1:36:44
संतोषी महादेव नरळे – 1:37:25 (वयोगट 30-34) अंकिता – 1:58:28
आरती श्रीपती कांबळे – 2:00:18
प्रणिता प्रदीप बाबर – 2:00:32 (वयोगट 35-39) ज्योती ठाकरे – 1:43:25
सिंधू उमेश – 1:52:01
रैनी सिंग – 1:56:42 (वयोगट 40-44) प्रीती राजेंद्र वाघ – 1:49:34
राधाप्रिया चेतन गाई – 1:49:50
पांड्या अर्पिता – 1:51:39 (वयोगट 45-49) रत्ना आशिष मेहता – 1:49:19
पूजा सितेश माहेश्वरी – 1:56:46
पूजा झुंझुनवाला – 2:05:15 (वयोगट 50-54) पल्लवी महेश मूग – 2:00:33
निकिता गोविल – 2:04:08
नीलिमा मनोज भडगांवकर – 2:04:20 (वयोगट 55-59) क्रांती प्रमोद साळवी – 2:10:38
बिमला बनवाला – 2:13:49
प्रेयसी प्रेमानंद चारी – 2:17:44 (वयोगट 60-64) क्रिस्टीन मारिया सालदांहा गरिकापती जगदीश्वरी – 2:43:31
सुचरिता अशोक कुमार – 2:49:31 घाटाचा प्रत्येक चढ धैर्याची परीक्षा घेत होता आणि प्रत्येक उतार वेगाला पंख देत होता. अखेर हजारो पावलांनी साताऱ्याच्या भूमीवर पुन्हा एकदा सिद्ध केले—हिल मॅरेथॉन जिंकायची असेल तर केवळ वेग पुरेसा नसतो; त्यासाठी जिद्द, ताकद आणि शेवटपर्यंत लढण्याची मानसिकता लागते!हे खेळाडूंशी संबंधित असलेले ब्रीद सातारा हाफ हिल मॅरेथॉन ने सिद्ध केले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *