Headlines

Violence in Andhra Pradesh elections, allegations of bogus voting, booths occupied, agents stopped


  • Marathi News
  • National
  • Violence In Andhra Pradesh Elections, Allegations Of Bogus Voting, Booths Occupied, Agents Stopped Jaganmohan

अमरावती14 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशमध्ये रविवारी १०० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान कडप्पा येथील पुलिवेंदुला येथे सत्ताधारी टीडीपी आणि वायएसआरसीपी कार्यकर्त्यांमध्ये चकमक व दगडफेक झाली. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बूथ बळकावल्याचा आणि बोगस मतदानाचा आरोप केला.

जगन म्हणाले, ‘टीडीपी कार्यकर्त्यांनी पहाटे ४ वाजताच बूथ ताब्यात घेतले होते. पुलिवेंदुला येथील ८० पैकी ७० बूथवर वायएसआरसीपीच्या एजंट्सना प्रवेश दिला गेला नाही. मतदारांकडून चिठ्ठ्या हिसकावून घेण्यात आल्या आणि पोलिसांनी त्यांना मतदान करण्यापासून रोखले.’ जगन यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली.

७ शहरांमध्ये मतदान रद्दकरण्याची मागणी

वायएसआरसीपीने ७ जिल्ह्यांमध्ये गैरप्रकाराचे आरोप केले. कोर्टाचे निर्देश असूनही १२,७२४ मतदान केंद्रांपैकी केवळ ६ ते ७ हजार केंद्रांवरच सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगची सुविधा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *