![]()
दीपावली सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सटाणा येथील लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठी इंग्लिश स्कूलमध्ये टाकाऊ वस्तू आणि रंगीत कागदांपासून आकर्षक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोज
.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांवर आर्थिक भार पडू नये, तसेच कमी खर्चात पर्यावरणपूरक पद्धतीने दीपावली साजरी करता यावी, हा कार्यशाळेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांना टाकाऊ पुठ्ठ्याचे खोके, रंगीत कागद आदी साहित्याचा वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पारंपरिक पद्धतीने दीपावली साजरी करताना पर्यावरणाचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे, याचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका जे. बी. देवरे, उपशिक्षक शेखर दळवी, कलाध्यापक लक्ष्मण गांगुर्डे व अरुणकुमार भामरे यांनी केले. कार्यशाळेचे नियोजन व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करून
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात आले.विजेत्यांनाच नव्हे, तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका जे. बी. देवरे व उपस्थित वर्गशिक्षकांच्या हस्ते शालेय साहित्य भेट देण्यात आले. याशिवाय दीपावलीनिमित्त शाडूच्या मातीपासून पणत्या तसेच शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील कलात्मक कौशल्य, कल्पकता आणि सर्जनशीलतेला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर दळवी यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.