Headlines

महिनाभरापासून रस्ता खोदून ठेवला:सोयगावात पाइपलाइनचे काम रखडले, उघड्या आसाऱ्यांमुळे अपघाताचा धोका, सोयगाव नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी



शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी महिनाभरापूर्वी सिमेंट रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र, अद्याप पाइपलाइनचे काम पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायतीच्या संथ का

.

वॉर्ड क्रमांक एकमधील मुख्य रस्त्यावर पाइपलाइनच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असून, या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे तुकडे आणि टोकदार लोखंडी सळ्या (आसारी) उघड्या पडल्या आहेत. हा शहरातील मुख्य रस्ता असल्याने या मार्गावरून दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्यांमुळे पादचारी, दुचाकीस्वार, विद्यार्थी, लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खोदकामानंतर काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार विनंती केली. ठेकेदाराच्या सुपरवायझरलाही याबाबत अनेकदा सांगण्यात आले; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घरासमोरच रस्ता खोदून ठेवल्याने ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, संबंधित पाइपलाइनचे काम कोणत्या ठेकेदारामार्फत सुरू आहे आणि या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे, याबाबत माहिती विचारली असता नगरपंचायत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिनाभरापासून रखडलेल्या कामामुळे नगरपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रशासनाने तातडीने दखल घेत काम पूर्ण करा : जावळे माझ्या घरासमोरच महिनाभरापासून पाइपलाइनसाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगरपंचायतीकडे वारंवार चकरा मारूनही काम पूर्ण करण्यात आलेले नाही. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाइपलाइनचे काम पूर्ण करावे आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वॉर्ड क्रमांक एकमधील रहिवासी रवी जावळे यांनी केली.

प्रत्येक प्रभागाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू Ãशहरातील पुनर्बांधणीचे काम सुरू असून, प्रत्येक प्रभागाचे काम एक-एक करून पूर्ण केले जात आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व प्रभागांतील कामे पूर्ण करण्यात येत आहे. -संभाजीराव देशमुख , मुख्याधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *