![]()
सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज, नांदगाव येथे शौर्य आणि महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण शनिवारी झाले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सावळदबारा परिसरातील पाच गावांत सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभही झाला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गरुड, सुनील मिरकर, सोयगाव सभापती उत्तम चव्हाण, माजी सभापती नवलसिंग पाटील, चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, पंचायत समिती सदस्या वृषालीताई मिरकर, सोयगाव भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य गजानन पवार, राहुल राठोड, सुनील गावंडे, संजीवन सोनवणे, दानवे यांनी सावळदबारा परिसराच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडली. मी असेपर्यंत सावळदबारा परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. घाणेगावातील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा भावी पिढ्यांना स्वराज्याचा गौरवशाली इतिहास, राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले. नांदागावातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यामुळे मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष, त्याग, शौर्य, स्वाभिमानाचा इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. दोन्ही स्मारकांच्या अनावरणामुळे परिसरात आनंदाचे वातावरण दिसून आले. दौऱ्यात सावळदबारा परिसरातील पाच गावांत विकासकामांना सुरुवात झाली. देव्हारी येथे सिमेंट रस्ता, सामाजिक सभागृहाचे काम सुरू झाले. डाभा येथे सामाजिक सभागृह सुरू झाले. नांदा तांडा येथे सिमेंट रस्ता सुरू झाला. घाणेगाव येथे सामाजिक सभागृह सुरू झाले. मूर्ती येथे सामाजिक सभागृहाचे काम सुरू झाले. या कामांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक सोयीसुविधांना चालना मिळणार आहे. इद्रिस मुलतानी यांनी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गरुड, सुनील मिरकर, सोयगाव सभापती उत्तम चव्हाण, माजी सभापती नवलसिंग पाटील, चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, पंचायत समिती सदस्या वृषालीताई मिरकर, सोयगाव भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य गजानन पवार, राहुल राठोड, सुनील गावंडे, संजीवन सोनवणे, जयप्रकाश चव्हाण, पंजाबराव कोलते, प्रकाश जाधव, सूरज कवाल, राजू रेनकोद, योगेश शिंदे, कृष्णा शिरसाट, फिरोज तडवी, मुकुंदा गायकवाड, अनिल राठोड, गोपाल गावडे, संभाजी पवार, विलास साबळे, अज्ञानसिंग राठोड, सीताराम जाधव उपस्थित होते. दानवे म्हणाले की सावळदबारा परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. घाणेगावातील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा भावी पिढ्यांना स्वराज्याचा गौरवशाली इतिहास, राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले. नांदागावातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यामुळे मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष, त्याग, शौर्य, स्वाभिमानाचा इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
घाणेगावात शिवाजी महाराज, नांदगाव येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांचे अनावरण:माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते अनावरण