Headlines

महापुरुषांच्या फोटोवरून वाद पेटला:शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बाळासाहेबांचा फोटो, सदावर्तेंचा आक्षेप; 15 दिवसांचा अल्टिमेटम




पुण्यातील एका महाविद्यालयात महापुरुषांच्या छायाचित्रांच्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी हा फोटो हटवल्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या वादावर भूमिका मांडत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रांगेत इतर कोणाचेही छायाचित्र असू नये, असे मत व्यक्त केले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट शिवसेना भवनातील छायाचित्रांचा संदर्भ देत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मग शिवसेना भवनातील फोटोचं काय?’ राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सदावर्ते यांनी शिवसेना भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि ऐतिहासिक महापुरुष असताना एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाचा फोटो त्याच परिसरात कोणत्या निकषाने लावण्यात आला आहे, असा सवाल त्यांनी केला. सदावर्ते यांनी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांच्या भूमिकेतील विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला. सदावर्ते यांच्या म्हणण्यानुसार, प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल समाजात वेगळा आदर आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे एका राजकीय पक्षाचे प्रमुख होते. त्यामुळे महापुरुषांच्या छायाचित्रांबाबत जर प्रोटोकॉल किंवा विशिष्ट निकष लावला जात असेल, तर तो सर्व ठिकाणी समान असायला हवा, असा त्यांचा युक्तिवाद आहे. शिवसेना भवनातील छायाचित्रांची मांडणी योग्य आहे का, असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांनी याबाबतही भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन केले. 15 दिवसांत फोटो काढा, अन्यथा न्यायालयात जाईन – गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिल्याचे सांगितले. या कालावधीत संबंधित फोटो हटवला गेला नाही, तर आपण स्वतः न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. गरज पडल्यास यासाठी उपोषण करण्याचीही तयारी असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या भूमिकेवरही निशाणा या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. एका बाजूला महापुरुषांच्या छायाचित्रांच्या रांगेत इतर कोणाचेही फोटो नकोत, अशी भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना भवनातील छायाचित्रांच्या मांडणीबाबत मौन बाळगायचे, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, पुण्यातील महाविद्यालयातील नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद आता शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा.. देशात धर्माची झिंग:लोकांना धर्मांध करून मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, दुसरीकडे लावा- राज ठाकरे राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रंद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्मांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण ज्या प्रकारे देशात वातावरण आहे ते तयार केले जात आहे, तुमच्यामध्ये राग निर्माण केला जात असून तुमचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *