Headlines

अमरावतीत नेताजींच्या पुतळ्याजवळच्या खड्ड्याने नागरिक त्रस्त:अभिवादन करणेही कठीण, रस्त्यावरून जाणेही अवघड; प्रशासनाचे दुर्लक्ष




अमरावती येथील गाडगेनगर परिसरात शिवाजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या एका कोपऱ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. शहरात नेताजींचा हा एकमेव पुतळा असल्याने अनेकजण येता-जाता त्यांना अभिवादन करतात. मात्र, पुतळ्यासमोरच असलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुतळ्याच्या अगदी समोर विभागीय क्रीडा संकुल ते गाडगेबाबा समाधीमंदिर हा उड्डाणपूल आहे. नेताजींना अभिवादन करण्यासाठी अनेकजण मुद्दाम उड्डाणपुलाखालील रस्त्याची निवड करतात. परंतु, या खड्ड्यामुळे त्यांना पुढे जाणे अवघड होते. उड्डाणपुलाखालचा हा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाला आहे. गाडगेनगरमध्ये राहणारे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी याच रस्त्याने ये-जा करतात. या खड्ड्यामुळे होणाऱ्या त्रासाची नोंद घेऊन काही जागरूक नागरिकांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही हा खड्डा बुजवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. या परिस्थितीबद्दल राजेंद्रसिंह बघेल या जागरूक नागरिकाने चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोरील रस्त्याची ही अवस्था योग्य नाही. एका बाजूला खड्डा आणि दुसऱ्या बाजूला गवत व इतर तणांनी व्यापलेला भाग अशी येथील स्थिती आहे. यात लवकर बदल होण्याची गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *