उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपूर्णपणे संपवण्याचे काम आणि विडा स्वतः संजय राऊत यांनीच उचलला आहे. ते हे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. जसा दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशीच काहीशी अवस्था सध्या संजय राऊत यांची झाली आहे. ते जे काही बोलतात, त्या
.
भरत गोगावले म्हणाले की, संजय राऊतांचा दिवस सकाळी उठून काहीतरी वेगळे आणि वादग्रस्त बोलल्याशिवाय जातच नाही. ते राजकारणात दुर्योधनाची भूमिका बजावत आहेत. ज्याप्रमाणे दुर्योधनाच्या हट्ट आणि भूमिकेमुळे 100 कौरवांचा नाश झाला, त्याचप्रमाणे मूळ शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच मुख्य कारणीभूत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कंस आणि दुर्योधन कोण आहे, हे जनतेला आता चांगलेच ठाऊक आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल गुणवत्तेवर आमच्याच बाजूने लागेल
भरत गोगावले म्हणाले की, सुप्रीम कोर्टात शिवसेनेची जी केस सुरू आहे, तिचा निकाल शंभर टक्के आमच्याच बाजूने लागेल. कारण आम्ही पूर्णपणे गुणवत्तेवर आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हे महायुतीचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहू. मी पावणेदोन वर्षे संयमाने थांबलो आणि पक्षाशी निष्ठा ठेवली, म्हणूनच मला आज पालकमंत्रीपद मिळाले आहे.
पुण्यात महायुती मजबूत करणार
गोगावले म्हणाले की, आम्ही पुणे शहरात संघटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.महानगरपालिका निवडणुकीत आमचे उमेदवार विजयी झाले नाहीत, हे सत्य आम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो. मात्र, आम्ही कटू सत्य स्वीकारून हिंदुत्वाच्या विचारांवर अधिक निष्ठेने काम करत राहू. हे ही वृत्त वाचा
छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजला नव्हता:हिंदू सुरक्षित आहेत, कोणी स्वतःला ‘हिंदूहृदयसम्राट’ समजू नये- संजय राऊत

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गेल्या 10 वर्षांत देशातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केले आहे. आज देशात हिंदू पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांना कोणताही धोका नाही. तरीही सर्व विषय त्याच मुद्द्यावर नेऊन मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. इतिहास साक्षी आहे की, हिंदू ज्या ज्या वेळी संकटात सापडला, त्या वेळी फक्त बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच मदतीला पुढे आली आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हिंदू सुरक्षित आहेत, त्यामुळे कोणीही स्वतःला ‘हिंदूहृदयसम्राट’ समजण्याचा आव आणू नये, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. वाचा सविस्तर