![]()
होर्मुझ खाडीत तणावामुळे इस्रायलमध्ये नोकऱ्यांचा खड्डा पडला आहे. तेथे राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. रोजगार मेळावे केवळ दिखाव्यासाठी होऊ नयेत तर त्यातून तरुण नोकऱ्यांमध्ये टिकावेत यासाठी या वेळी नियुक्त्यांपूर्वी व नंतर खास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ‘दिव्य मराठी’ च्या मुंबई कार्यालयात झालेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. राज्यात गुंतवणुकीच्या तुलनेत रोजगाराचे आकडे वाढताना दिसत नाहीत, ही तफावत का निर्माण झाली आहे? एआय आणि ऑटोमेशन यामुळे थेट मनुष्यबळाची गरज मर्यादित झाली आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणावर काम उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, नवीन विमानतळ, पोर्ट सुरू झाल्यावर सुरुवातीला 20 ते 22 हजार आणि पुढे जाऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 1 लाखापर्यंत रोजगार निर्माण होतात. स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात ही महाराष्ट्र सरकार म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे. कर्नाटक किंवा तामिळनाडूच्या तुलनेत महाराष्ट्रात इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर्सचा विस्तार मंदावला आहे, तो कसा वाढवणार? ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी आम्ही तिसऱ्या मुंबईत 100 एकर जागेवर भव्य ‘इनोव्हेशन सिटी’ उभारत आहोत. यामध्ये चित्रपट, ऑटोमोबाइल, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र इनोव्हेशन संकुले असतील. हे केंद्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आशियात अग्रगण्य ठरेल. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याचा आराखडा तयार केला असून पुढील सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. एकीकडे रोजगार नाही तर दुसरीकडे उद्योगांना आवश्यक एआय, रोबोटिक्स या क्षेत्रातील कौशल्य असलेले मनुष्यबळ मिळत नाही ही तक्रार असते. यावर आपल्या खात्यातर्फे काय पावले उचलली जात आहेत? त्यांची तक्रार रास्त आहे. राज्यातील प्रत्येक शासकीय आयटीआयमध्ये 6 अत्याधुनिक कोर्सेस सुरू केले आहेत. तसेच तरुणांकडे 2-3 वर्षे थांबायला वेळ नसल्याने आम्ही 3 ते 5 महिन्यांचे अल्पमुदतीचे कोर्सेस सुरू केले. तरुण संध्याकाळी किंवा शाळा-कॉलेज सांभाळून हे शिक्षण घेऊ शकतात. पहिल्या टप्प्यात 65,000 विद्यार्थ्यांनी हे कोर्सेस पूर्ण केले असून यंदा ही संख्या 1 लाखावर जाईल.
आपल्या खात्यातर्फे रोजगार मेळावे भरवले जातात, मात्र प्रत्यक्षात खूप कमी नोकऱ्या मिळतात, असे का? निव्वळ देखाव्यासाठी कंपन्यांचे स्टॉल्स लावून तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे या वेळी आम्ही जाणीवपूर्वक मोठ्या कंपन्यांच्या मागे धावलो नाही. या वेळी लघु व मध्यम उद्योगांना निमंत्रित केले आहे. त्यांची स्थानिक गरज लक्षात घेऊन नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आधी ‘सॉफ्ट स्किल्स’चे प्राथमिक प्रशिक्षण आणि निवड झाल्यानंतर 15 दिवसांचे प्रशिक्षण देणार आहोत. 29 सप्टेंबरला एकाच दिवशी 100 मेळाव्यांच्या माध्यमातून 50 हजार तरुणांना अॅपॉइंटमेंट लेटर देण्याचे लक्ष्य आहे.
Source link
युद्धामुळे इस्रायलमध्ये संधी, शासनाचा रोजगारासाठी पुढाकार:सरकारी नोकऱ्यांवर मर्यादा, स्वयंरोजगार हेच भविष्य- मंत्री मंगलप्रभात लोढा