![]()
मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जगात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, संशयास्पद ॲप डाऊनलोड करू नका आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन मैत्री करताना सावध
.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चोळमुख येथे विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. वाय. बोरसे व कॉन्स्टेबल ए. के. कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरसे यांनी अल्पवयीन आत्महत्या प्रतिबंध, कायद्याचे पालन आणि सायबर गुन्हे या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सायबर बुलिंग, ऑनलाईन हॅरसमेंट, फसव्या लिंक, बनावट ॲप, डिजिटल अरेस्ट आणि अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन मैत्री यातील धोके विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, फोटो, पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करू नये, असा इशाराही देण्यात आला. मोबाईलचा अतिवापर टाळून त्याचा उपयोग शिक्षण, ज्ञान आणि कौशल्यविकासासाठी करण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना ‘गूड टच-बॅड टच’, महिला व बाल सुरक्षा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत १०९१ आणि ११२ या मदत क्रमांकांचा वापर कसा करावा, याची माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन शिक्षक वाय. बी. पाटील यांनी केले, तर अधीक्षिका पी. एम. पांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.