![]()
तालुक्यात यंदा अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांसह चारा पिकेही संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी चारा टंचाई जाणवू लागल्याने पशुपालकांकडून चाऱ्यासाठी ऊस पिकाला कोयता लावला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अस्तित्वात असलेल्या एकमेव अशोक
.
पावसाचे ओव्हरफ्लोचे पाणी चाऱ्यांना न मिळाल्याने विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यामुळे मका, घास यासह अन्य चारा पिकांना पाणी देणेही शक्य होत नाही. अनेक भागांत रानडुकरांनी उभ्या मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास उन्हाळ्यात पाणी आणि चारा टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती आहे.
सध्या चारा संकटात उसाचा आधार मिळत असला, तरी पाण्याअभावी ऊस पिकेही अडचणीत आहेत. त्यामुळे चाऱ्यासाठी ऊसतोड सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणावर ऊस चाऱ्यासाठी गेला, तर अशोक कारखान्याच्या गाळपावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच साखरेचे संकट दूर करण्यासाठी ऑक्टोबरमध्येच साखर कारखान्यांचे गाळप सुरू करण्याचा सरकारी पातळीवर विचार सुरू आहे.
शेळ्या-मेंढ्यांना चरायला गवतच नाही शासकीय आकडेवारीनुसार श्रीरामपूर तालुक्यात ६३ हजार ७५ गायी, ७ हजार १६६ म्हशी, ४ हजार ५४६ मेंढ्या आणि ५३ हजार १२३ शेळ्या, असे एकूण १ लाख २७ हजार ९०८ पशुधन आहे. अनेक पशुपालकांकडे स्वतःची जमीन नसल्याने शेळ्या-मेंढ्यांना चरायला नेले जाते. मात्र पाऊस नसल्याने गवत वाळले असून, जनावरे चरवायची कुठे, हा प्रश्न गंभीर झाला आहे.