![]()
जिल्ह्यात गेल्या ४२ दिवसांपासून पावसाचा खंड पडला असून संकटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, यासह अन्य मागण्या करीत काँग्रेसने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्या लावून धरल्या. तसेच जिल्
.
शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकली आहेत. खरिपाचे पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळल्याने जिल्ह्यात तातडीने दुष्काळ निवारण उपाययोजना लागू करण्यात याव्यात, या मागणीसाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश तायडे, महानगराध्यक्ष महेंद्र गवई यांच्या नेतृत्वात मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देण्यात आले. महेश गणगणे, अक्षय राऊत, माजी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, राजेश गावंडे, अतुल अमानकर किसान काँग्रेस कार्याध्यक्ष रवी पाटील अरबट, विजय देशमुख उगवेकर, अतुल खोटरे, सुनील वानखडे, अतुल काठोळे, भूषण तायडे, देवानंद राठोड, गणपत जाधव, सुरेंद्र उगले, विनोद आंबुसकर प्रकाश राठोड, संदीप राठोड, मांगीलाल पवार, गिरधारी पवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती व आगामी सण, उत्सवांचे दिवस लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. पीक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तातडीने अदा करण्याबाबत संबंधित विमा कंपन्यांना निर्देश देण्यात यावेत.
सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून जिल्ह्यातील ज्या महिलांची नावे वगळण्यात आली त्या महिलांच्या कागदपत्रांची व पात्रतेची पुन्हा पडताळणी करून त्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्यात यावे. जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या महिलांच्या नावांची यादी प्राप्त करून देण्यात यावी,अशाही मागण्या करण्यात आल्या. सध्याच्या पीक स्थितीबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या परिस्थितीबाबत शासनाला माहिती देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सर्व मागण्या मान्य होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास आठवडाभरानंतर जिल्ह्यात संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी यांनी दिला.
मागण्या मान्य झाल्यास आठवडाभरानंतर आंदोलन करण्याचा तायडे यांचा इशारा