Headlines

ई-घंटागाड्या चार्जिंगसाठी 60.18 लाखांतून ट्रान्सफार्मर:वीज व्यवस्था, प्रभाग 4 व 17 मध्ये दाेन जागा; विषयांना देण्यात आली मंजुरी‎




अकोला मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनात ई-वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. घनकचरा संकलन करणाऱ्या ई-वाहनांसाठी प्रभाग ४ व १७ मधील दोन जागांवर ट्रान्सफार्मरसह विद्युत चार्जिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान निधी अंतर्गत ही कामे केली जाणार आहेत. दोन्ही कामांची अंदाजपत्रक किंमत ६०.१८ लाख रुपये आहे. स्थायी सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सभेत दोन विद्युत कामांच्या निविदांवर चर्चा करून संबंधित कमी दराच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग १७ मधील रमाबाई नगर येथे घनकचरा संकलन ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी विद्युत व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या कामाची अंदाजपत्रकीय किंमत २९ लाख ९५ हजार रुपये आहे.. मे. न्यू मयूर इलेक्ट्रिकल, अकोला या कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय दरापेक्षा ०.५ टक्के कमी दराची निविदा सादर केली. मनपाच्या ४८ घंटागाड्या इलेक्ट्रिक शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपाच्या १४ नंबर शाळेत पाणी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शाळेतील पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजेशी संबंधित हा विषय असल्याने त्याकडे लक्ष देण्याचे निर्देश सभापती अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. सर्व शाळांमध्ये तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सुरक्षा रक्षकांच्या मुदत वाढीवरुन सदस्य आक्रमक महापालिकेतील ३९ सुरक्षा रक्षकांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थगित ठेवण्यात आला होता. काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान व फजलू पहेलवान यांनी हा विषय पुन्हा उपस्थित केला. सुरक्षा रक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न असून त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, सुरक्षा रक्षकांकडून कामात कसूर झाल्याचे निदर्शनास आले असल्यास त्यांच्यावर कारवाई का करू नयेॽ, असा प्रश्न सभापती विजय अग्रवाल यांनी उपस्थित केला. कोणालाही कामात निष्काळजीपणा करण्याची मुभा देता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मनपाच्या ४८ कचरा संकलन घंटागाड्या इलेक्ट्रिक आहेत. या वाहनांची चार्जिंग नव्याने विद्युत व्यवस्था उभारण्यात येत असलेल्या दोन ठिकाणी होणार आहे. कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदाराच्या मालकीच्या ई-घंटागाड्यांची चार्जिंग या ठिकाणी होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *