Headlines

पंकजा मुंडेंच्या रॅम्प वॉकवरून विरोधक आक्रमक:संजय राऊत म्हणाले- मुंडेंना रॅम्प हेच पर्यावरण वाटते; इम्तियाज जलील अन् पटोलेंचाही सरकारवर घणाघात




भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा मुंबईतील एका फॅशन शोमधील रॅम्प वॉकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मुंडे यांनी या बॉम्बे फॅशन्सच्या कार्यक्रमात रॅम्प वॉक केला आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागांत, विशेषतः मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना मंत्र्यांनी अशा फॅशन शोमध्ये सहभागी होण्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावरून राज्य सरकार आणि पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. इम्तियाज जलील यांची टीका पंकजा मुंडेंच्या रॅम्प वॉकवर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीचा संदर्भ देत उपहासात्मक टीका केली. ते म्हणाले, “सरकारने शेतकऱ्यांना ५००० रुपये दिले आहेत ना, मग पंकजा मुंडेंनी रॅम्प वॉक केला तर त्यात काय अडचण आहे? आता ५००० रुपये मिळाल्यावर शेतकरी खूप आरामात जगू शकतो. लोकांना सवय झाली आहे आणि सरकारने इतका पैसा दिलाय, की आता कशाला विरोध करायचा?” अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या मदतीची आणि मंत्र्यांच्या वागणुकीची खिल्ली उडवली. नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत सरकारवर हल्लाबोल केला. “या सरकारला दुष्काळाचे काय देणेघेणे आहे? यांचे मंत्री आणि आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन दाढी-कटिंगसाठी २५-२५ हजार रुपयांचे बिल देतात आणि शेतकऱ्यांना ५००० रुपये देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे,” असा गंभीर आरोप पटोले यांनी केला. ‘३५ हजार कोटी कुंभमेळ्याला आणि शेतकऱ्यांना ठेंगा’ कुंभमेळ्यावर होणाऱ्या खर्चाचा दाखला देत पटोले पुढे म्हणाले, “सरकारने कुंभमेळ्यावर ३५,००० कोटी रुपये खर्च केले आहेत, त्याला आमचा विरोध नाही. पण महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय? हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता कोणाला रॅम्पवर चालायचे आहे, ते त्यांनी खुशाल चालावे.”
पंकजा मुंडे सध्या रॅम्पवर, त्यांना रॅम्प हेच पर्यावरण वाटते, संजय राऊतांची टीका खासदार संजय राऊत यांनीही पंकजा मुंडे यांच्या रॅम्प वॉकवरून निशाणा साधला आहे. “पंकजा मुंडे सध्या रॅम्पवर आहेत. त्यांना रॅम्प हेच पर्यावरण वाटते, सोडून द्या,” अशा शब्दांत राऊत यांनी उपरोधिक टीका केली. ————— हेही वाचा.. महाराष्ट्रातील 5 हून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी: एकाच ई-मेल पॅटर्नने खळबळ, इमारती रिकामी करून तपासणी सुरू
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील एकाच वेळी पाचहून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी दिली असून, सर्व न्यायालयांना आलेल्या धमकीचा ‘पॅटर्न’ एकच असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सातारा, ठाणे, हिंगोली, बीड आणि सोलापूर येथील न्यायालयांच्या इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या असून, पोलिसांची एकच धावाधाव उडाली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *