मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दिवाळी प्रदूषण जनजागृती मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून सुरू झालेला वाद आता आणखी पेटला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या आक्षेपानंतर महापालिकेने हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला होता. यानंत
.
दुसरीकडे, शिंदेसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी मात्र दिया मिर्झाची पाठराखण करत “तिने कोणताही शहाणपणा शिकवला नसून चांगलाच संदेश दिला आहे, यात धार्मिक तेढ आणू नये,” असे विधान केल्याने या मुद्द्यावरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
स्वतः लक्झरी गाड्यांतून फिरताना कार्बन फुटप्रिंट विसरतात का?
महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झाच्या पूर्वीच्या भूमिकांचा पाढा वाचत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. “दिया मिर्झा यांनी कायम हिंदूविरोधी आणि अराजकता पसरवणाऱ्या घटकांना साथ देण्याचे काम केले आहे. गुजरातच्या जनतेच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नर्मदा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला. नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रोल केले. समान नागरी कायद्याला (UCC) विरोध दर्शवला, तर कधी काश्मीरमधील लष्कराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.”
लक्झरी गाड्या आणि ढोंगी पर्यावरणप्रेम
“स्वतः आलिशान लक्झरी गाड्यांमधून फिरताना आणि व्हीआयपी प्रवास करताना त्यांना स्वतःच्या कार्बन फुटप्रिंटचा विसर पडतो; मात्र हिंदूंचे सण आले की लगेच त्यांना पर्यावरण आठवते. स्वतःच्या वैयक्तिक सोशल मीडिया हँडलवर त्या काय बोलतात ते त्यांचे स्वातंत्र्य असू शकते, पण मुंबई महापालिकेच्या अधिकृत ‘माय बीएमसी’ (MyBMC) पोर्टलवर त्यांची प्रसिद्धी आम्ही खपवून घेणार नाही.”

100% ब्लॅकलिस्ट
“महायुती सत्तेत असताना हिंदू धर्माविरोधी आणि देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना पालिकेच्या कोणत्याही अधिकृत कामात स्थान दिले जाणार नाही. आम्ही त्यांना 100% ब्लॅकलिस्ट केले आहे.”
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; मला न विचारता यादी कशी केली?
प्रशासनाने परस्पर व्हिडीओ प्रसिद्ध केल्याबद्दल महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “उच्च न्यायालयाने वाढत्या हवेच्या प्रदूषणाला (AQI) आळा घालण्यासाठी सेलिब्रिटींच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माधुरी दीक्षित आणि मराठी कलाकारांचे व्हिडीओ घेण्यात आले. मात्र जनसंपर्क विभागाने ही कलाकारांची यादी महापौर म्हणून माझ्या टेबलावर पाठवणे बंधनकारक होते. जर मला ती यादी दाखवली असती, तर मी सुरुवातीलाच दिया मिर्झाचे नाव रद्द करायला लावले असते.”
आयुक्तांना जाब विचारणार
“साडेचार वर्षांनंतर मुंबई महापालिकेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी, महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने परस्पर थेट निर्णय घेणे अत्यंत चुकीचे आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत मी पालिका आयुक्तांना पत्र लिहून खुलासा मागणार आहे आणि प्रशासनाला जाब विचारणार आहे.”
उपमहापौर संजय घाडींकडून दिया मिर्झाची पाठराखण; महायुतीत मतभेद!
भाजपने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना, शिंदेसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी मात्र दिया मिर्झाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. “दिया मिर्झाने कोणताही शहाणपणा शिकवलेला नाही. तिने मुंबईकरांना आवाजाने नाही तर आनंदाने आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा, असे अत्यंत चांगले आणि सकारात्मक आवाहन केले होते.”
धार्मिक तेढ निर्माण करू नका
“उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कलाकारांनी विनामूल्य पुढे येऊन जनजागृती केली आहे. दिवाळी हा सर्व जाती-धर्मांचा आणि आनंदाचा सण आहे, त्यामुळे यामध्ये कोणीही विनाकारण धार्मिक तेढ आणू नये,” असे म्हणत घाडी यांनी भाजपच्या भूमिकेशी असहमती दर्शवली.
घाडींच्या भूमिकेवर महापौरांचे स्पष्टीकरण
उपमहापौरांच्या या विधानावर विचारले असता महापौर रितू तावडे म्हणाल्या, “प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. परंतु भाजप आणि आम्ही सर्वजण हिंदुत्व जपण्यासाठी ठाम आहोत. हिंदू सणांना टार्गेट करणाऱ्यांना आम्ही कदापि सहन करणार नाही.”
किशोरी पेडणेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी “महापालिकेवर अमित साटम यांची दहशत आहे आणि महापौर फक्त बाहुली आहेत,” असा आरोप केला होता. त्यावर पलटवार करताना महापौर म्हणाल्या, “किशोरी पेडणेकर स्वतः एकदा म्हणाल्या होत्या की, सकाळी मातोश्रीवरून फोन येतो आणि महापौरांवर टीका केल्याशिवाय तुमचा दिवस सुरू होऊ शकत नाही. विरोधक म्हणून स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी त्यांना रोज महापौरांवर बिनबुडाचे आरोप करावे लागतात. त्यांच्या अशा विधानांना मी काडीचीही किंमत देत नाही.”
पक्षशिस्त महत्त्वाची
“मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी जर पक्षाची भूमिका मांडली, तर तो संपूर्ण भाजपचा निर्णय असतो. आम्ही एका शिस्तीत काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे महापालिका कोणी बाहेरून चालवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” शेवटी महापौरांनी सर्व मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच, शहराचा वाढता एक्युआय (AQI) लक्षात घेऊन फटाक्यांचा अतिरेक टाळावा आणि पर्यावरणपूरक हरित दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही केले.
————————————————————————–
हेही वाचा…
भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये: मोदींना पळून जाऊ देणार नाही, त्यांच्यावर खटले चालणार, त्यांच्यासह सर्व जेलमध्ये जाणार- संजय राऊत

भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये. त्यांनी जर खरोखरच महाराष्ट्राची चिंता केली असती, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली नसती, असा जोरदार घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चलो दिल्ली रॅलीच्या यशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी