Headlines

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाच्या तपासाची धंगेकरांची मागणी:चालकाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुपारी दिल्याचा आरोप




माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राणा सूर्यवंशी कथित हल्ला प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा आणि पोलीस संरक्षणाच्या गैरवापराची चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात धंगेकर यांनी मुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांना निवेदन दिले आहे. धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यात चर्चा सुरू झाली आहे. राजकीय किंवा व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूर्यवंशी यांनी स्वतःवर बनावट हल्ला घडवून आणल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. या कथित हल्ल्यासाठी चालकामार्फत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुपारी दिल्याचाही त्यांचा दावा आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र, मुख्य सूत्रधारावर कारवाई झाली का, असा प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. चालक स्वतःहून इतके मोठे पाऊल उचलू शकतो का, याची तपासणी करून सर्व संबंधितांची भूमिका पडताळावी, अशी मागणी त्यांनी केली. राजकीय किंवा बाह्य दबावाखाली न येता तपास करावा आणि सूर्यवंशी यांच्याशी संबंधित पूर्वीच्या हल्ल्यांच्या प्रकरणांचीही पुन्हा चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीच्या घटनांबाबतही पोलिसांची दिशाभूल झाल्याचे बोलले जात असल्याचा दावा धंगेकर यांनी केला. सूर्यवंशी यांना पूर्वी देण्यात आलेल्या ‘वाय प्लस’ सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणीही धंगेकर यांनी केली. ही सुरक्षा कोणाच्या शिफारशीवरून आणि कोणत्या निकषांनुसार मंजूर झाली, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतरही सूर्यवंशी यांना एक पोलीस सुरक्षा रक्षक दिला जात असल्याचा दावा धंगेकर यांनी केला. हे संरक्षण तात्काळ काढून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्य आणि पुणे जिल्ह्यात स्वतःला उद्योजक म्हणवणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना दिलेल्या पोलीस संरक्षणाची यादी जाहीर करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. अशा संरक्षणाचे लेखापरीक्षण करून अनधिकृत संरक्षण मागे घ्यावे आणि सर्व बाबींची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती धंगेकर यांनी केली. —————- हेही वाचा.. हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी: ई-मेल मिळताच पोलिस, बीडीडीएस पथकाकडून 3 तासांपासून शोधमोहीम सुरू
हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बाँम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आज सकाळी न्यायालयाच्या पोर्टलवर पाठविण्यात आला. मेल पाहताच तातडीने पोलिस विभागाला माहिती देण्यात आली असून मागील तीन तासापासून न्यायालयाच्या परिसरात तपासणी सुरु करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील न्यायालयात दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *