Headlines

पुण्यात विवाहितेची आत्महत्या:सासू-सुनेत वाद झाल्याची माहिती; झांबरे पॅलेसवर दगडफेक, मुकुंदनगर परिसरात तणाव




पुणे शहरातील मुकुंदनगर परिसरात २९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पायल पवार झांबरे असे मृत महिलेचे नाव आहे. ती अभियंता असल्याची माहिती मिळाली आहे तसेच तिला चार वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येपूर्वीच्या रात्री पायल आणि तिच्या सासूमध्ये जोरदार भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने झांबरे पॅलेस येथे दगडफेक करून तोडफोड केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पायल हिचे सहा वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते आणि तिच्या कुटुंबीयांनी सासरच्यांना मोठा हुंडा देखील दिला होता असे सांगण्यात येते. त्यानंतर तिला नंतर चार वर्षाची मुलगी देखील आहे. पायलने मुकुंद नगरमधील जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेतला. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पायलला गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेच्या आदल्या रात्री तिचे सासूसोबत जोरदार भांडण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या वादानंतरच पायलने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात असले, तरी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर झांबरे पॅलेस येथे दगडफेक आणि तोडफोड झाल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली. या प्रकारामुळे परिसरात तणाव वाढला. दगडफेक आणि तोडफोड नेमकी कोणी व कोणत्या कारणाने केली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.मात्र, पायल हिच्या मृत्यूनंतर तिच्याशी संबंधितांनी ही तोडफोड केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. दरम्यान, या प्रकरणात पायलच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणे महत्त्वाचे आहे. तिच्या मृत्यूमागील नेमके कारण, सासरच्या मंडळींकडून कथित छळ झाला होता का आणि आदल्या रात्री झालेल्या वादाचा घटनेशी काही संबंध आहे का, या बाबी तपासातून स्पष्ट होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *