![]()
अपुऱ्या व असमान पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटाच्या विळख्यात सापडला असून पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तेल्हारा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. या मागणीसाठी मंगळवारी तालुक्यातील श
.
यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात पावसाचे वितरण अत्यंत कमी राहिले आहे. काही ठिकाणी पाऊस झाला आहे. अनेक गावांमध्ये पावसाने मोठा खंड दिला आहे. त्यामुळे पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. सोयाबीन, कापूस व अन्य खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आहे. त्यात पावसाची अनिश्चितता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जास्तगाव, जाफ्रापूर, वाडी, कोठा, रायखेड, राणेगाव, वरुड, भोकर, तळेगाव, तळेगाव बाजार, वरुड वडनेर, तेल्हारा, पंचगव्हाण, भांबेरी, अकोली, बेलखेड, हिंगणी, घोडेगाव, गाडेगाव, खापरखेड, वांगरगाव, दहिगाव, शेरी, बाभुळगाव, उकळी बाजार, वरुड वडनेर, चांगलवाडी, थार, माळेगाव यासह तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले. गावोगावी पिकांची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.
त्यामुळे प्रशासनाने केवळ पर्जन्यमानाची कागदोपत्री आकडेवारी पाहून निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करावी. जमिनीतील ओलाव्याचीही पाहणी करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तेल्हारा तालुक्याचा कोरडा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
तातडीने गावनिहाय वस्तुनिष्ठ पंचनामे करा तालुक्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा, पेरणी क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीची गावनिहाय वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावे. शासनाच्या लागू दुष्काळ निकषांनुसार सर्वेक्षण करत त्याचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.