Headlines

खेळाडूंच्या भवितव्याशी डिजिटल खेळ; सॉफ्टवेअर ठप्प:क्रीडा स्पर्धा लांबणीवर, दोन खेळांमध्ये खेळण्याची‎संधी कमी असण्याची शक्यता‎




जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू, स्पर्धा, क्रीडा प्रकार, तारीख, वेळ, संघ, शाळांची नोंदणी करण्यासाठी शासनाने केवळ एकच सॉफ्टवेअर तयार केले. मात्र, या सॉफ्टवेअरमध्ये सतत येत असलेले अडथळे, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करण्याचे प्राथमिक स्तरावरील कामच सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात एक ते दीड महिना लांबल्या आहेत. यामुळे खेळाडूंचे शैक्षणिक व क्रीडा विषयक नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. गेल्या वर्षीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे नोंदणीसाठी वेगळे सॉफ्टवेअर होते. खेळाडू, स्पर्धा, क्रीडा प्रकार, वेळ, संघ, शाळांची नोंदणी अगदी सहज होत होती. परंतु, यंदा राज्यभरातील शालेय खेळाडूंची सर्वप्रकारची नोंदणी करण्यासाठी शासनाने केवळ एकच केंद्रीय सॉफ्टवेअर ठेवले. त्यावर गर्दी वाढली. प्रवेशिका, नोंदणीमुळे सॉफ्टवेअरवर ताण वाढल्याने ते वारंवार ठप्प पडत असून नोंदणी प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. एकूणच गोंधळामुळे जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होणारी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी घेणेच आता शक्य होणार असल्याची माहिती क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने यांनी दिली आहे. अनेक खेळाडू हे एक ते दोन खेळांमध्ये सहभागी होत असतात. परंतु, स्पर्धा एक ते दिड महिने उशिरा होत असल्यामुळे अत्यंत वेगाने, घाईत क्रीडा प्रकार घेतले जातील कारण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. एकाच दिवशी दोन क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाईल. अशात खेळाडू विद्यार्थ्यांना कोणत्याही एका खेळावर पाणी सोडावे लागू शकते. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. खेळाडूंना ५० % संधींवर पाणी सोडण्याची वेळ खेळ आल्यास ऑगस्ट नेहमीची वेळ दिवस उशीराचा कालावधी सप्टेंबर यंदाची नवी तारीख ऑगस्ट महिन्यात सुरू होणारी स्पर्धा २५ पासून जिल्हा क्रीडा स्पर्धा या दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू होतात. तत्पुर्वीच तालुका क्रीडा स्पर्धा जुलैमध्ये घेतल्या जातात. जे संघ किंवा खेळाडू तालुका स्पर्धेत प्रावीण्य मिळवतात. ते जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतात. परंतु, यंदा सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्यात सुरू होणारी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा ही अद्याप सुरू झाली नसून २५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे कार्यालयाने सांगितले. परीक्षेसह अभ्यासात अडथळा येण्याची शक्यता;खेळाडूंची तारांबळ उडणार सप्टेंबरच्या २५ तारखेपासून जिल्हा क्रीडा स्पर्धा सुरू होणार असून या कालावधीत विद्यार्थी खेळाडूंची पहिली घटक चाचणी असते. तर ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेनंतर प्रथम सत्र परीक्षा असते. अशात सराव, क्रीडा स्पर्धा, परीक्षांचा अभ्यास अशी विद्यार्थी खेळाडूंची चांगलीच तारांबळ उडणार आहे. अनेक पालक तर परीक्षा तोंडावर असेल तर पाल्याला खेळात सहभागी होऊ देत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची क्रीडा विषयक नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. दोन खेळांमध्ये खेळण्याची संधी कमी असण्याची शक्यता आता जुन्याच सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी सुरू ^राज्यस्तरावरील केंद्रीय सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करताना त्रास होत असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंसह शाळा, खेळ, स्पर्धांची नोंदणी जुन्याच सॉफ्टवेअरमध्ये केली जात आहे. – गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *