![]()
रात्रीच्या गडद अंधारात दारूच्या नशेत झिंगत घरी पोहोचलेला नवरा आणि त्याची ताटकळत वाट पाहत बसलेली बायको… या रोजच्या कौटुंबिक प्रसंगाला जेव्हा विनोदाची झालर लागली, तेव्हा संपूर्ण नाट्यगृहात श्रोत्यांना हसून हसून लोटपोट होण्याची वेळ आली. ‘हास्यरंग’ नाट
.
एकेकाळी हास्य जत्रा गाजवणारे प्रसिद्ध हास्य कलाकार विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, गौरव मोरे आणि मयुरी रानडे यांनी एकूण चार विनोदी लघु नाटिका सादर केल्या. मायबोलीचा हा उपक्रम नाट्यरसिकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात मायबोलीचे संस्थापक, अध्यक्ष विजयकुमार माढेकर आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांसमोर दीपप्रज्वलन करून झाली.
प्रास्ताविक मुकुंदराज कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रशांत मोहिरे यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार शुक्ला माढेकर, जवाहर माढेकर, प्रमोदिनी कोठारी, शिल्पा माढेकर, पल्लवी माढेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आभार राजेंद्र श्रीश्रीमाळ यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली मोहिरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पंढरपूर बँकेचे अधिकारी अमित उत्पात, मायबोलीचे अरुण शहा, व्यंकटेश कुलकर्णी आदी मान्यवर होते. योगेश अग्रवाल, रामराजे पाटील यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील पाटील, जितेंद्र माढेकर, निलेश माढेकर, राजेश खाडे, डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ.तेजस लाड, सुमन चंद्रशेखर, शारदा पानगावकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच कलाकारांनी अचूक टायमिंग आणि खुसखुशीत संवाद फेकीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. विशाखा सुभेदार आणि पॅडी कांबळे यांच्यातील जुगलबंदीने तुफान हशा पिकवला. गौरव मोरे यांच्या अंतरंगी हावभावांनी आणि गावरान ढंगातील संवादांनी लहान-थोर सर्वांना हसून हसून बेजार केले. मयुरी रानडे हिने आपल्या सहज-सुंदर अभिनयाने लघुनाटिकांना उत्तम जोड दिली.