Headlines

रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षक दिन:77 विद्यार्थी बनले ‘शिक्षक’; पुष्प, पेन व प्रमाणपत्र देऊन शिक्षकांचा गौरव‎




शिक्षकांच्या उदात्त अध्यापन कार्याचा गौरव करण्याबरोबरच तरुण मनांना घडवून राष्ट्राच्या विकासात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे प्रतिपादन रेसिडेन्शिअल हायस्कूलचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांनी केले. येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता दहावीच्या ७७ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारत विद्यालयाचे दैनंदिन कामकाज सांभाळले. विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून सार्थक चाटे, विद्यार्थी उपमुख्याध्यापक म्हणून अद्वैत ढोले, तर विद्यार्थिनी पर्यवेक्षिका म्हणून ज्ञानेश्वरी नवल यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी शिक्षकांनी विद्यालयातील शिक्षकांचा गुलाबपुष्प, पेन व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिन हा प्रत्येक शिक्षकासाठी महत्त्वाचा दिवस असून, शिक्षकांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, असे शिक्षक संतोष मिसाळ यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बालाजी गायकवाड, उपमुख्याध्यापक अविनाश रामफळे, पर्यवेक्षक महेश शिंदे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन काव्या सातपुते व श्रेया राऊत यांनी, तर आभार कार्तिकी पवार व श्रेया यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *