![]()
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी करमाळा तालुक्यातील केम ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ८) एकजूट दाखवली. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केम गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावातील व्यापारी, नागरिक आणि मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस विविध गावांतून पाठिंबा मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केम ग्रामस्थांनीही आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र येत बंद पुकारला. यावेळी शासनाने आरक्षणाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करूननिर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. बंद दरम्यान ग्रामस्थांनी गावामध्ये घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘लढेंगे जितेंगे हम सब जरांगे’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘चलो मुंबई’ अशा घोषणांनी केम परिसर दणाणून गेला. आरक्षणाच्या मागणीवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत दाखवलेली ही एकजूट चर्चेचा विषय ठरली.
Source link
मराठा समाज आरक्षण:केममध्ये बाजार बंद, व्यापारपेठा थंड, एक मराठा-लाख मराठासह चलो मुंबईच्या घोषणा