Headlines

डिग्रस कऱ्हाळे येथे मधमाशांचा हल्ला:हिंगोलीच्या पालिका मुख्याधिकाऱ्यासह नगरसेवक जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल




हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाहण्यासाठी गेलेल्या हिंगोली पालिकेच्या पथकावर सोमवारी (ता. 2) दुपारी मधमाशांनी हल्ला चढवला. यामध्ये पालिका मुख्याधिकाऱ्यांसह नगरसेवक व कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने हिंगोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंगोली शहरामध्ये सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. दिवाळीच्या सणामध्ये पाण्याची अडचण भासू नये तसेच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आज दुपारच्या सुमारास पालिकेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंढे, गट नेते श्रीराम बांगर नगरसेवक कपिल खंडेलवाल विशाल गोटरे, अमेर अली, कर्मचारी बाळू बांगर अभियंता साठे, कंत्राटदार मयूर अग्रवाल, कन्हैया खंडेलवाल यांचे पथक डिग्रस कन्हाळे येथील जल शुद्धीकरण केंद्रावर पाहण्यासाठी गेले होते. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे एकच धावपळ झाली. मधमाशांच्या हल्ल्यातून बचावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. डॉ अखिल अग्रवाल, डॉ मयूर अग्रवाल, डॉ प्राची अग्रवाल, डॉ विजया अग्रवाल यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहे. सध्या या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. अखील अग्रवाल यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *