Headlines

दुबार पेरणीचे संकट; कर्जमाफीचा लाभदेखील शेतकऱ्यांना मिळेना:जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर करण्यात आले आंदोलन‎




शेतकरी दुबार पेरणीसह अन्य संकटांचा सामना करत असून, आता तर अॅग्रीस्टॅक क्रमांक मिळत नसल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहोत. त्यामुळे तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करत बार्शीटाकळी शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी हातात सुकलेले सोयाबीन घेत परिस्थिती किती भिषण आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती येजनेच्या लाभासाठी अॅग्रीस्टॅक क्रमांक आवश्यक आहे. अॅग्रीस्टॅक क्रमांक मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांचा फार्मर आयडी निघतो आणि फार्मर आयडी काढल्यानंतरचे शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होते. आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच योजनेची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. मात्र ७/१२ उताऱ्यावरील “इतर हक्क’ सदरामध्ये नोंद असलेल्या शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक क्रमांक शासनाच्या संबधित विभागाने प्रलंबित ठेवल्यामुळे हजारो शेतकरी कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत नावे असूनही कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ७/१२ उताऱ्यावरील “इतर हक्क’ या सदरामध्ये नोंद असलेल्या पात्र शेतकऱ्यांचा शासनाच्या संबधित विभागाने अॅग्रीस्टॅक क्रमांक त्वरीत उपलब्ध करून द्यावा. ही प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढुन आधार प्रमाणीकरण करता येईल व कर्जमुक्तीची रक्कम जमा होईल, असे शेतकरी म्हणाले. धरणे आंदोलनात भीमसागर इंगळे, विजय सिद्धार्थ इंगळे, विलास सावळे, गोवर्धन सावे, आशाबाई वानखडे, कैलास आठवले, शामराव चव्हाण, शोभा खंडारे आदी सहभागी झाल्या. मुख्यमंत्री, कृषीमंत्री , महसूलमंत्री, कृषी उपंसाचलक, जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नाही. हजारो शेतकऱ्यांचची नावे शासनाच्या पात्र यादीत नावे असूनही ते कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.त्यामुळे अॅग्रीस्टॅक क्रमांक त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. हेक्टरी १ लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी जिल्ह्यातील अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर आणि पातूर या तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके दुबार पेरणीसह संकटात सापडली आहेत. शासनाने या गंभीर परिस्थितीची त्वरीत दखल घेवून जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १ लाख रुपयांची मुदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *