Headlines

Eknath Shinde London Visit; Maharashtra Schemes Get Global Recognition


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणार आहे. ब्रिटनच्या संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कार्यक्रमांसाठी शिंदे यांना व

.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री लंडनकडे रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यात ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्समधील महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याबरोबरच महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’

बुधवार 9 सप्टेंबर रोजी ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी शिंदे यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना शिंदे यांनी राबवलेल्या नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीची दखल घेत हा सन्मान दिला जात असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या पुरस्कारासाठी शिंदे यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या योजनांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, सरकारी सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठीचा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आणि तरुणांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी व कामाचा अनुभव मिळवून देण्यासाठीची ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा समावेश आहे.

ब्रिटनमधील मुलांच्या चित्रांतून ‘लाडकी बहीण’ योजनेची झलक

शिंदे यांच्या लंडन दौऱ्यातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे ‘कॅनव्हास फॉर केअर’ या संसदीय कला प्रदर्शनाचे आयोजन. या प्रदर्शनात ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या संकल्पनेवर आधारित चित्रे काढली आहेत. ही चित्रे ब्रिटिश संसदेतील कला प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कल्याणकारी योजनांची चर्चा केवळ राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक माध्यमातूनही होणार आहे. आयोजकांच्या मते, शिंदे यांना देण्यात येणारा सन्मान हा प्रशासनातील कार्यक्षमता, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांना थेट लाभ पोहोचवण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आहे.

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन मांडणार

गुरुवार 10 सप्टेंबर रोजी शिंदे यांचा आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये होणार आहे. इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026 : ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात त्यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख आर्थिक आणि गुंतवणूक केंद्र असल्याने या परिषदेत शिंदे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन मांडणार आहेत. त्याचबरोबर भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध, व्यापार, उद्योग आणि गुंतवणुकीच्या संधी यावरही ते आपले विचार मांडण्याची शक्यता आहे. नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील महाराष्ट्रातील कामगिरीचाही या कार्यक्रमात उल्लेख होणार आहे.

ब्रिटिश संसदेत अनेक देशांतील मान्यवरांची उपस्थिती

या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने ब्रिटिश संसदेतील दोन्ही सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, विविध शहरांचे महापौर, वेगवेगळ्या देशांचे राजदूत, जागतिक स्तरावरील उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिंदे यांना महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः महाराष्ट्रात उद्योग आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या संधी, पायाभूत सुविधांचा विकास, शहरांचा विस्तार आणि नागरिककेंद्री योजनांची माहिती या माध्यमातून ब्रिटनमधील उद्योगविश्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक संबंधांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार

ब्रिटिश संसदेतील दोन कार्यक्रमांव्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांचा लंडनमधील महाराष्ट्र मंडळाकडूनही विशेष सन्मान केला जाणार आहे. लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला तब्बल 94 वर्षांचा इतिहास आहे. या संस्थेला भेट देताना शिंदे यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी केलेले योगदान तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यांसारख्या कल्याणकारी उपक्रमांची दखल या सन्मानाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यामुळे शिंदे यांच्या लंडन दौऱ्यात एकाच वेळी राजकीय, प्रशासकीय, आर्थिक आणि सामाजिक अशा विविध पातळ्यांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व होणार आहे.

2 दिवसांत 3 पुरस्कारांचा मान

एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यात मिळणाऱ्या तीन पुरस्कारांकडे विशेष लक्ष लागले आहे. पहिला सन्मान 9 सप्टेंबरला हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या स्वरूपात केला जाणार आहे. त्यानंतर 10 सप्टेंबरला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. याशिवाय लंडनच्या महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील विविध लोककल्याणकारी योजनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत आणि स्वावलंबनाचा आधार देण्याचा प्रयत्न, ‘शासन आपल्या दारी’मधून नागरिकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचवण्याची पद्धत आणि युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराभिमुख अनुभव देण्याचा प्रयत्न यांची दखल घेतली जात आहे.

लंडन दौऱ्याचा महाराष्ट्रासाठी काय फायदा होणार?

एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याचा राजकीय सन्मानापेक्षा आर्थिक आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने होणारा परिणाम महत्त्वाचा ठरू शकतो. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित परिषदेत महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन मांडण्याची संधी मिळणार असल्याने ब्रिटनमधील गुंतवणूकदार आणि उद्योगविश्वाशी संवाद साधण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. महाराष्ट्र आधीपासूनच देशातील औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये उद्योग व पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. अशा पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका मांडणे आणि राज्यात गुंतवणुकीसाठी उपलब्ध संधींची माहिती देणे या दौऱ्याचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.

हेही वाचा…

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह: युद्धामुळे इस्रायलमध्ये संधी, शासनाचा रोजगारासाठी पुढाकार:सरकारी नोकऱ्यांवर मर्यादा, स्वयंरोजगार हेच भविष्य- मंत्री मंगलप्रभात लोढा

होर्मुझ खाडीत तणावामुळे इस्रायलमध्ये नोकऱ्यांचा खड्डा पडला आहे. तेथे राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. रोजगार मेळावे केवळ दिखाव्यासाठी होऊ नयेत तर त्यातून तरुण नोकऱ्यांमध्ये टिकावेत यासाठी या वेळी नियुक्त्यांपूर्वी व नंतर खास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ‘दिव्य मराठी’ च्या मुंबई कार्यालयात झालेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.