Headlines

पाणीटंचाईने अंबानेरकर त्रस्त; पंचायत समितीवर हंडा मोर्चा:ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी‎




अंबानेरमध्ये काही भागांत पाणीपुरवठा सुरळीत आहे, मात्र काही भागांत इलेक्ट्रिक मोटारीने पाणी भरले जात असल्याने गावांतील काही नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीसाठी माजी सरपंच संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व महिलांनी दिंडोरी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. अंबानेर ग्रामपंचायतीतील विविध कामांमध्ये संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. ठेकेदाराच्या कारभारावर कारवाईची मागणी वारंवार करूनही ग्रामपंचायत विभागाने ठोस पावले उचलली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. { उर्वरित पान. ३ ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी. संबंधित ठेकेदार, सरपंच व जबाबदार सदस्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा. ^ प्रत्येक नागरिकाला पाणीपुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे प्रथम कर्तव्य आहे. चौकशी समिती स्थापन करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करू. – सुनील पाटील, बीडीओ, दिंडोरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *