Headlines

पंगतीत जेवणासाठी मोफत स्टील ताट, ग्लास‎:न्या, वापरा व धुऊन परत करा; ‘भांडी बँक'' संकल्पनेला पंचक्रोशीत पसंती‎




सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे आणि पंगतींमधून निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यावर मात करण्यासाठी पातूर तालुक्यातील हिंगणा (उजाडे) येथील ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. ‘प्लास्टिकमुक्त हिंगणा गाव’ अभियानांतर्गत गावात जेवणासाठी मोफत स्टीलचे ताट व ग्लासची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘न्या, वापरा आणि स्वच्छ धुऊन परत करा’ या तत्त्वावर ही ‘भांडी बँक’ चालवली जात आहे. ‘वाढदिवस वृक्ष’ संकल्पना राबवणारे विज्ञान शिक्षक शेषनाग उजाडे यांनी ग्रामस्थांसमोर प्लास्टिकमुक्तीची संकल्पना मांडली. त्याला ग्रामस्थांनी भरभरून दाद देत लोकसहभागातून निधी गोळा केला. वाडेगाव येथील किशोर जैन यांच्यासह अनेक दानशूरांच्या सहकार्यातून ५५० स्टीलची ताटे, ५०० पाण्याचे ग्लास आणि ३०० चहाचे ग्लास खरेदी करण्यात आले. सार्वजनिक जेवणांमध्ये ही भांडी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जातात. या उपक्रमामुळे ५ सप्टेंबर २०२५ पासून आजतागायत ७ हजारांहून अधिक लोकांच्या जेवणातून निर्माण होणारा प्लास्टिक कचरा रोखण्यात यश आले आहे. हिंगणा गावापाठोपाठ आता बेलुरा, दिग्रस, वाडेगाव आणि तांदळी या पंचक्रोशीतील गावांमध्येही ही संकल्पना रुजली असून ग्रामस्थ या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. स्वच्छतेसाठी लवकरच ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात ताट व ग्लासांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. तसेच भांड्यांच्या जलद व निर्जंतुक स्वच्छतेसाठी एक ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन घेण्याची तयारी सुरू आहे. या उपक्रमाच्या नियोजनात छत्रपती फिटनेस क्लब आणि गावातील युवा सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग लाभत आहे, असे शेषनाग उजाडे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *