Headlines

कुस्तीमध्ये वणीच्या सरस्वती विद्या मंदिरचे यश:राज्यस्तरीय स्पर्धेत 14 सुवर्ण, 19 रौप्य व 7 कांस्य पदकांवर विद्यार्थ्यांची मोहोर‎




धुळे येथे दि. ४, ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय कॉलेज मल्लयुद्ध आणि ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत वणी येथील सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उंचावले. या स्पर्धेत विद्यालयातील सात मुले व १३ मुली, अशा एकूण ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची उत्कृष्ट प्रचिती देत १४ सुवर्णपदके, १९ रौप्यपदके व ७ कांस्यपदके, अशी एकूण ४० पदके पटकावली. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी क्रीडाशिक्षक सिद्धार्थ चंद्रमोर, मुख्याध्यापिका सविता मोरे, समोनी कड व सौ. अनुराधा तिवारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सराव करून घेतल्यामुळेच हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. संतोष कड यांनीही मुलांच्या यशासाठी विशेष सहकार्य केले. यापूर्वीही तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आगामी काळात डेहराडून, उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, परिसरातील नागरिक व पालकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल विद्यालयातील क्रिडा शिक्षक सिध्दार्थ चंद्रमोरे यांनी तसेच पालक व क्रीडाप्रेमींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *