![]()
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणे लागतो. या भावनेने शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. आई-वडिलांबरोबरच विद्यार्थ्यांवर शिक्षक ही संस्कार करीत असतात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेतील सर्व शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. जय आनंद महावीर युवक मंडळ सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक राजेश भंडारी यांनी केले. नवी पेठ येथील बाई इचरजबाई प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया, मंडळाचे कार्याध्यक्ष सत्येन मुथा, आनंद मुथा, नितीन मुनोत, प्रमोद गांधी उपस्थित होते. मुनोत म्हणाले, जय आनंद महावीर मंडळाच्यावतीने गेल्या ३८ वर्षांपासून बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेतील शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात येत आहे. या शाळेतील हजारो विद्यार्थी मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने येथील विद्यार्थी घडले आहेत. वर्षभर मंडळाच्या उपक्रमात शिक्षकांचा सहभाग लाभत असतो. शिक्षक वैभव वाघ यांना काका ट्रस्टचेवतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थी आयुष थोरवे व ओजस्वी ढगे यांनी शिक्षकांप्रती मनोगत व्यक्त केले. बाळु कोटकर यांनी यादी वाचन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विशाल तांदळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन नेहुल व कांतीलाल खुरंगे यांनी केले. आभार आनंद मुथा यांनी मानले.
Source link
आई-वडिलांप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांना संस्कार देतात- भंडारी:शहरातील बाई ईचरजबाई फिरोदिया प्रशालेतील शिक्षकांचा केला सन्मान