Headlines

ग्रामस्थांच्या “बेंच’ चळवळीतून शालेय विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदले:अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी शाळेत राबवला उपक्रम‎



अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पालकांनी एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत ‘एका विद्यार्थ्यासाठी एक बेंच, माझे अभिमानास्पद पालकत्व’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

.

‘बेंच’ चळवळीच्या आवाहनातून आठवडाभरातच ६८ हजार रुपयांचा निधी जमा झाला. त्यातून विद्यार्थ्यांसाठी ४० बेंच उपलब्ध झाले व लोकसहभागातून शिंदेवाडी शाळेचे रूपडेच पालटले. सुरुवातीस मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी १ हजार ७०० रुपये किमतीचा बेंच देण्याचे आवाहन केले. आवाहनाची जनजागृती केली. सोशल मीडियावरही आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत गणोरे येथीलच रामकृष्ण दातीर यांनी आईच्या हस्ते २० हजार रुपयांची पहिली देणगी दिली. यानंतर प्रा. डॉ.अशोक दातीर, प्रभाकर आहेर, लता आहेर, ज्ञानेश्वर आहेर, रावसाहेब दातीर, गोरक्षनाथ दातीर, प्रा. शरद तुपविहिरे, सुनील कडलग, प्राचार्य श्रीकांत माघाडे, सुनील घुले, समीर शाह यांच्यासह अनेक दात्यांनी आपले योगदान दिले. ‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ या भावनेला लोकसहभागाचे चांगले पाठबळ मिळाले.

याच शाळेत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून उपस्थित महिलांना ५१ केशर आंबा रोपे वाटण्यात आली. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य व जिल्हास्तरावर यश मिळविलेली श्रावणी दातीर हिचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर माळवे उपस्थित होते. देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख उत्तम गायकवाड, डॉ. नीलम शिंदे, डॉ. दिपाली पानसरे, स्नेहलता कडलग, दिगंबर दातीर, प्रियंका हांडे उपस्थित होते. मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षिका कल्पना पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता झाली. लोकसहभागातून टेबल अन् खुर्च्याही भेट पोषण महासप्ताह आणि पारंपरिक दहीहंडी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या औचित्याने झालेल्या कार्यक्रमात या बेंचेसचे लोकार्पण करण्यात आले. बेंचसोबत शाळेला महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड, डॉ. दिपाली पानसरे, डॉ. नीलम शिंदे व स्नेहलता कडलग यांनी टेबल व सहा खुर्च्या भेट दिल्या. काहीजणांनी शैक्षणिक साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके, विद्यार्थ्यांना वह्या, सतरंजी व पेन दिले. काहींनी अंगणवाडीतील बालकांना गरजेनुसार कपडे भेट दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *