Headlines

एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या:मोहोळमधील बैठकीत पोलिस अधीक्षकांच्या सूचना‎




सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा,”नो डीजे नो डॉल्बी”या संकल्पनेचा प्रभावी वापर करा, तसेच एक गाव एक गणपतीला प्राधान्य द्या, सामाजिक तेढ निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नका, रस्त्यावर स्टेज मारू नका असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले . मोहोळ शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटीलयांच्या समवेत शांतता कमिटीची बैठक आयोजन मंगळवारी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले होते. या वेळी प्रस्ताविकात पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले.शहरासह तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांनी महाराष्ट्रा समोर आदर्श निर्माण करावा. पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे,गणेश मूर्ती जवळ सीसीटीव्ही कॅमेरे व स्वयंसेवक ठेवा, जेणे करून गणेशमूर्ती विटंबनेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पोलीस रेकॉर्ड लिस्टवर असणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. तुम्ही त्या यादीत येऊ नका. पुढील विसर्जन मिरवणुकीत तुमचे नाव पोलिसांच्या कारवाईच्या यादीत येऊ देऊ नका,असा इशाराही अधिक्षक कुलकर्णी यांनी गणेश मंडळांना दिला.गणेश उत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक उपक्रम राबविण्याचे आवाहन करत मंडळांनी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपावी,असेही आवाहन केले. या वेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, परिक्षाविधीन पोलिस उपअधीक्षक गणेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप, पोलिस निरीक्षक दीपक पाटील, मोहोळ पोलिस ठाण्यातील सर्व सहायक पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक बीट अंमलदार सर्व पोलिस पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *