Headlines

'जेन झी' प्रचंड ताणात:एमपॉवर सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष; 49.5% तरुण भावनिक त्रासाचा सामना एकट्यानेच करतात, वाचा




जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत ‘एमपॉवर’ या सामाजिक उपक्रमाने “अनपॅक युअर इमोशनल बॅगेज” हे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली NCR, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर या 10 प्रमुख शहरांतील 18 ते 25 वयोगटातील ‘जेन झी’ तरुणांकडून मिळालेल्या प्रतिसादांवर हे सर्वेक्षण आधारित आहे. यातून भारतातील तरुणांची मानसिक स्वास्थ्याविषयीची जागरूकता आणि प्रत्यक्षात मदत मिळणे यातील मोठी तफावत समोर आली आहे. एकटेपणा आणि मदत घेण्याची अनिच्छा 49.5% तरुण ताणाच्या भावना लपवून ठेवून स्वतःच्या बळावर सामना करतात. केवळ 9.2% तरुणांनी प्रोफेशनलकडून मदत मागितली आहे. 40.9% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, ठीक नसतानाही ते इतरांना ‘मी ठीक आहे’ असे सांगतात. भावनिक त्रास व्यक्त केल्यावर 40.4% तरुणांना फक्त ‘मजबूत राहा’ असा सल्ला दिला जातो. याउलट, पूर्वग्रह न ठेवता पाठिंबा मिळाल्याचे सांगणारे केवळ 13.6% प्रतिसादक होते. मानसिक ताणातील तीव्र लिंगभेद 47% तरुणांना सहजरित्या राग किंवा चिडचिड जाणवते, 36.7% लोकांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, तर 31.3% तरुणांच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. 60% महिलांमध्ये अतिविचार, 56% महिलांमध्ये स्वतःविषयी शंका आणि 69% महिलांमध्ये बॉडी इमेजविषयी चिंता दिसून येते. पुरुष (बाह्य तणाव) 57% पुरुषांमध्ये कामाशी संबंधित तणाव आणि 54% पुरुषांमध्ये आर्थिक असुरक्षितता अग्रस्थानी आहे. तसेच, दुसरी व्यक्ती निदर्शनास आणून देईपर्यंत तणावाची जाणीव न होणाऱ्यांमध्ये 60% पुरुष आहेत. एमपॉवरच्या संस्थापकीय अध्यक्षा नीरजा बिर्ला आणि चीफ मेडिक ॲडवायजर डॉ. झिरक मार्कर यांनी स्पष्ट केले की, तरुणांना ‘बळकट राहा’ किंवा ‘अतिविचार थांबवा’ असे वरवरचे सल्ले देण्याऐवजी शाळांमधूनच मानसिक आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आत्महत्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी केवळ चर्चा न करता, तरुणांना पूर्वग्रहविरहित आणि सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही काळाची गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *